“मनोज जरांगे शरद पवारांचं नाव का घेत नाही, सर्वात आधी मी जरांगेंना..”, आ. लाड यांनी काय सांगितलं?

Prasad Lad Criticized Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. मुंबईतील आझाद मैदानात (Mumbai Azad Maidan) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं आंदोलन सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा (Maratha Reservation) दिवस आहे. या घडामोडी घडत असतानाच भाजप नेतेही आक्रमक झाले आहेत. भाजपाचे विधानपरिषदेतील आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी शरद पवारांचं नाव घेत मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत मनोज जरांगे पाटील शरद पवार यांच्यावर टीका का करत नाहीत असा सवाल लाड यांनी विचारला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर त्यांचं दुकान सुरू झालं आहे असा टोला आमदार लाड यांनी लगावला.
आमदार लाड यांनी लेट्सअप मराठी चर्चेत बोलताना विविध राजकीय मुद्द्यांवर मते व्यक्त केली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांच्याकडून राजकारण केले जाऊ नये अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तु्म्ही म्हणता मनोज जरांगे पाटील शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका का करत नाहीत? पण सत्तेतल्या लोकांकडे आरक्षण मागायचं की विरोधकांकडे असे विचारले असता लाड म्हणाले, ‘शरद पवारही सत्तेत होतेच ना. अण्णासाहेब पाटील यांच्यापासूनच खरंतर मराठा आरक्षणाचा लढा सुरू झाला.’
‘मनोज जरांगे पाटील यांनी काही मराठा समाजाचा ठेका घेतलेला नाही. मी देखील मराठा आहे. आता माझं त्यांना आव्हान आहे. आजचं नाही. मनोज जरांगेंना सर्वात आधी मी अंगावर घेतलं. माझ्या पक्षात भर बैठकीत आमदारांनी माझा विरोध केला होता. ह्यांना बोलायला काय जातं पण आम्हाला त्याच्या प्रतिक्रिया ऐकाव्या लागतात असं आमदारांचं म्हणणं होतं. मनोजदादा का शरद पवारांचं नाव घेत नाहीत अशी माझी त्यांना जाहीर विचारणा आहे.’ असे आव्हान लाड यांनी दिले.
पण आता जरांगेंना वारंवार आंदोलन का करावं लागतंय याचंही उत्तर तुम्ही दिलं पाहिजे यावर बोलताना ‘जरांगेंनी त्यांच्याकडील वस्तुस्थिती घेऊन चर्चेला बसलं पाहिजे. दहा टक्के आरक्षण दिलं, सारथी दिलं. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळातून हजारो कोटी रुपये खर्च करून एक लाख तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. या गोष्टी कुणामुळे शक्य झाल्या तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामुळेच. पण जरांगे पाटलांना याचं राजकारणच करायचं असेल तर मग काही पर्याय नाही.’
Breaking! मराठा आरक्षणसाठी सरकारचा नवा फॉर्म्युला जवळपास ठरला, जरांगेंसमोर मांडला जाणार?
भाजपाचे लोक मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटवत आहेत असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. ‘असं आहे की ओबीसी आणि मराठा समाज आपापल्या पद्धतीने संघर्ष करत आहेत. भाजप हा राष्ट्रीय पातळीवरील पक्ष आहेत. यात अनेक समाजघटक आहेत. त्यामुळे अशा पद्धतीनं वाद करून राजकारण करणं भाजपला आणि फडणवीसांना जमलं नाही. फडणवीसांनी आतापर्यंत फक्त विकासाचं राजकारण केलं आहे.’
जरांगेंनी आरक्षणाचं राजकारण करू नये
‘माझा प्रश्न असा आहे की जरांगे पाटलांना आताच का जाग आली? कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Maharashtra Local Body Elections ) तोंडावर आल्या आहेत त्यामुळे त्यांचं दुकान सुरू झालं आहे. मराठा समाजाला खऱ्या अर्थाने आरक्षण मिळवून द्यायचं असेल तर त्यांनी राजकारण करू नये इतकंच माझं म्हणणं आहे.’
जरांगेंना कोण पैसे देत, शोध घ्या
‘सोशल मीडिया टीम चालवण्यासाठी जरांगे पाटील यांच्याकडे कुठून पैसे आले? पाच हजार गाड्या आणण्यासाठी कुठून पैसे आले? हे कुणाच्या तरी पैशांवर चाललं आहे. तुमच्या टीम चालवता, कॉल सेंटर चालवता, तुमच्याबद्दल काही बोललं की लगेच शिव्या द्यायला सुरुवात करता, सोशल मीडियावर घाण बोलण्यास सुरुवात करता. या सगळ्या गोष्टी त्यांच्या टीमकडून होतात. यासाठी त्यांच्याकडे पैसा कुठून येतो याचा शोध घेतला गेला पाहिजे.’ असेही भाजप आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस कुटील डाव खेळत आहेत, मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप…