देवेंद्र फडणवीस कुटील डाव खेळत आहेत, मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप…

Manoj Jarange Warns CM Devendra Fadnavis : मराठा आंदोलनाचा (Maratha Protest) आज पाचवा दिवस आहे. आझाद मैदानावरील मराठा आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली आहे, यानंतर मनोज जरांगे यांनी (Manoj Jarange) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पोलीस जेलमध्ये नेतील. आम्ही तिथे उपोषण करू. तुम्ही एखाद्या समाजावर अन्याय होईल असं वागू नका. मराठ्यांना इथून हुसकून देणं, ही काळजात रूतणारी सल आहे. देवेंद्र फडणवीस असं करू नका, तुम्हाला महागात पडेल. तुम्ही पोलिसांना सांगून अटक करायला लावाल, पोलिसांना लाठीचार्ज करायला (Devendra Fadnavis) लावाल, हा मोठा डाग लागेल, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय.
गोरगरिब मराठ्यांचा सन्मान करा
जितका शांततेत तुम्हाला मार्ग काढता येईल, तितका गोरगरिब मराठ्यांचा सन्मान करा. हे गरिब लोक तुम्हाला कधी विसरणार नाही. पण तुम्ही अपमान केला, तर त्यांच्या मनात बदला घेण्याची चीड निर्माण होईल. जिकडं घुसायचं नाही, तिकडे घुसू नका. मी मेलो तरी आझाद मैदानातून हटणार नाही. तु कुठल्याही थराला गेला, तर मी कोणत्याही टोकाला जायला तयार आहे, असा इशारा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. गाड्या पार्किंगला लावा. रेल्वे, एसटीने प्रवास करा. मग या. माझी कितीही तब्येत खराब झाली, तरी तुम्ही शांत राहायचं, असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना केलं आहे.
बीडमधील धक्कादायक घटना! बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील नागरगोजेंची गळफास घेऊन आत्महत्या
कुटील डाव खेळायला लागला
मी मरेपर्यंत मुंबई सोडत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांना ठासून सांगत आहे. न्यायदेवता आपल्यावर अन्याय करणार नाही, असा देखील विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केलाय. सरकारला नासकी सवय लागली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आमच्याशी अन्यायकारक वागू नये. परंतु देवेंद्र फडणवीस उलटं-सुलटं करतो. चुकीची माहिती न्यायदेवतेला देतो. देवेंद्र फडणवीस कुटील डाव खेळायला लागला. आम्ही काहीच करत नाही, असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
गॅझेटची अंमलबजावणी करा…
सातारा आणि हेद्राबाद गॅझेट लागू करा. शिंदे समितीने याचा अभ्यास झाल्याचं सांगितलं आहे. आम्ही चर्चेला तयार आहोत. आमचे पोरं कोणाला त्रास देत नाही, आम्हाला फक्त आरक्षणसोबत देण-घेणं आहे. मागितलेले चारही गॅझेटिअर लागू करा. दोनसाठी वेळ घ्या, पण दोन गॅझेटची अंमलबजावणी करा, असं देखील जरांगे यांनी म्हटलं आहे. आता या विषयावर चर्चा करायला येतो म्हटले, परंतु ते आले नाही.
शनिवार-रविवारनंतर खूप पोरं मुंबईत दिसतील. सोमवारनंतर चाललेलं आंदोलन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चुकीमुळे चालू असलेलं आंदोलन असेल, असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. मराठे मुंबईत येणार. त्यांना तुम्ही अडवू शकणार नाही. हे दिवस देवेंद्र फडणवीस साहेबांनी येऊ देऊ नये. अजूनही आमच्या मनात कटूता नाही, असं देखील जरांगे यांनी स्पष्ट केलंय.