Mumbai Mulund Hit And Run Case : राज्यात हिट अँड रनच्या घटना काही केल्या थांबण्यास (Hit And Run) तयार नाहीत. मुंबईत तर या घटना (Mumbai News) सातत्याने घडत आहेत. भरधाव वेगातील वाहनांच्या धडकेत निष्पाप लोकांचे नाहक (Road Accident) बळी जात आहेत. मालाड येथील अपघाताची घटना ताजी असतानाच आता मुलुंडध्ये असाच भीषण अपघात घडला आहे. आज गणेश चतुर्थी. राज्यात गणरायाचं आगमन होत आहे. आज याच दिवशी पहाटेच्या सुमारास एका आलिशान कारने दोघा जणांना चिरडल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोघे तरूण गणेशोत्सव मंडळाचे बॅनर रस्त्यावर लावत होते. याच वेळी या दोघांना कारने जोराची धडक दिली. यात एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
आधी धडक दिली, नंतर फरपटत नेलं; मालाडमधील भीषण अपघातात महिलेचा मृत्यू
आज गणेश चतुर्थी. गणरायाचं घराघरात आगमन होत आहे. मुंबईत गणेशोत्सवाचा वेगळाच उत्साह असतो. शहरातील मुलुंड भागात गणरायाच्याच आगमनाची तयारी सुरू होती. दोन कार्यकर्ते पहाटेच्या वेळी बॅनर लावत होते. त्याचवेळी हिट अँड रनची घटना घडली. भरधाव कारने कार्यकर्त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. कार्यकर्त्यांना उडवल्यानंतर चालक तेथून फरार झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे चार वाजता मुलुंडमध्ये बीएमडबल्यू कारने बॅनर लावणाऱ्या दोन कार्यकर्त्यांना धडक दिली. यात एका जणाचा मृत्यू झाला आहे. दूसऱ्याची परिस्थिती गंभीर आहे. मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाजवळ हा अपघात घडला. कारने धडक दिल्यानंतर कारचालक तेथून लगेचच फरार झाला. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
तेराव्याहून परतणाऱ्या टेम्पोला बसची जोरदार धडक,भीषण अपघातात 15 जणांचा मृत्यू…