Uddhav Thackeray Criticized Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत यश मिळल्यानंतर उद्धव ठाकरे वेगळ्याच (Uddhav Thackeray) मूडमध्ये दिसत आहेत. आता त्यांनी आपले सगळे लक्ष विधानसभा निवडणुकीवर केंद्रीत केले आहे. आज मुंबईतील रंगशारदा सभागृहात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची (Mumbai News) महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ठाकरेंनी नेहमीच्या शैलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपवर घणाघाती टीका केली. आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी फडणवीस डाव खेळत होते हे मला अनिल देशमुखांनी सांगितलं. आता एकतर तू राहशील नाहीतर मी राहिल, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना थेट ललकारलंच.
मी नडलो तर असा नडलो की मोदींनाही घाम फुटला.. उद्धव ठाकरेंनी पुन्हा डिवचलं
उद्धव ठाकरे यांच्या या थेट टीकेनंतर ठाकरे आणि भाजप यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मशाल चिन्ह घराघरात घेऊन जा अशा सूचना केल्या. ठाकरे पुढे म्हणाले, आता निवडणुका आल्या आहेत तेव्हा हे लोक (भाजप) आग लावण्याचे धंदे सुरू करतील. आताही काहींना फोन येत असतील. फोडाफोडीचा प्रयत्न होईल पण मी आताच सांगतोय ज्यांना जायचं असेल त्यांनी जा पण दगाबाजी करू नका. मी आणि शिवसैनिक राहतील त्यांना घेऊन मी लढेन. आपल्या आईशी गद्दारी करू नका ज्यांना जायचं तर आत्ताच जा, असे स्पष्ट करत मी तर याच निर्धारानं मैदानात उतरलोय की एकतर तुम्ही राहाल नाहीतर मी तरी राहिल असे आव्हान उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना दिले.
मागील काही दिवसांत मला अनेक लोक येऊन भेटून गेले. त्यातल्या अनेकांनी मला सांगितलं की उद्धवजी आपने देश को दिशा दिखाई है. त्यावर मी म्हणालो जो पर्यंत सरळ होतो तोपर्यंत सरळ असतो. पण एकदा का वाकड्यात घुसलो की मग आपणही वाकडं करतो. भाजप म्हणज चोर कंपनीत आहे. ही राजकारणातली सगळी षंढ माणसं आहेत अशी घणाघाती टीका त्यांनी भाजपवर केली.
अजित पवार विष्णूदास तर फडणवीसांमुळे मराठी माणसाला सुख नाही; संजय राऊतांचं टीकास्त्र
शिवसेना गंजलेली तलवार नाही तर तळपती तलवार आहे. मुंबई वाचवण्यासाठी आपल्याला लढा द्यायचा होता. आज आपल्याच हक्काच्या मुंबईत आपल्याला अशा पद्धतीनं वागवलं जात आहे. हे सगळं दोन व्यापारी करत आहेत. त्यांची ही वृत्ती आपल्याला मुळापासून उपटून टाकायची आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.