“मी नडलो तर असा नडलो की मोदींनाही घाम फुटला”; उद्धव ठाकरेंनी पुन्हा डिवचलं

“मी नडलो तर असा नडलो की मोदींनाही घाम फुटला”; उद्धव ठाकरेंनी पुन्हा डिवचलं

Uddhav Thackeray Criticized BJP : लोकसभा निवडणुकीत यश मिळल्यानंतर उद्धव ठाकरे वेगळ्याच (Uddhav Thackeray) मूडमध्ये दिसत आहेत. आता त्यांनी आपले सगळे लक्ष विधानसभा निवडणुकीवर केंद्रीत केले आहे. आज मुंबईतील रंगशारदा सभागृहात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची (Mumbai News) महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ठाकरेंनी नेहमीच्या शैलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर घणाघाती टीका केली. मी नडलो तर असा नडलो की मोदींनाही घाम फुटला अशा शब्दांत त्यांनी हल्लाबोल केला. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढच्या वाढदिवसाला उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील, ठाकरेंच्या शिलेदारानं ठासून सांगितलं

आता निवडणुका आल्या आहेत तेव्हा हे लोक (भाजप) आग लावण्याचे धंदे सुरू करतील. आताही काहींना फोन येत असतील. फोडाफोडीचा प्रयत्न होईल पण मी आताच सांगतोय ज्यांना जायचं असेल त्यांनी जा पण दगाबाजी करू नका. मी आणि शिवसैनिक राहतील त्यांना घेऊन मी लढेन. आपल्या आईशी गद्दारी करू नका ज्यांना जायचं तर आत्ताच जा असे स्पष्ट करत मी तर याच निर्धारानं मैदानात उतरलोय की एकतर तुम्ही राहाल नाहीतर मी तरी राहिल असे आव्हान उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना दिले.

कालपर्यंत माझ्या घरातील लोक आज माझ्यावर चाल करून येतात मलाही वाईट वाटतं. काल अनिल देशमुखांनी सांगितलं की मला तुरुंगात टाकण्यासाठी कसे या फडणवीसाचे डाव होते. सगळं सहन करून मी जिद्दीनं उभा राहिलोय. अजूनही माझ्याकडे चिन्ह नाही, पक्ष नाही आणि पैसाही नाही तरी सुद्धा मी आव्हान देऊ शकतो ते तुमच्या ताकदीवर आणि भरवशावर. मी म्हणजे मी नाही तर तुम्ही आहात. आज विरोधकांच्या छातीत जी धडकी भरली आहे ती तुमच्यामुळेच असे म्हणताच सभागृहात उपस्थित शिवसैनिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

गोरगरिबांचा जीव घेणं हे कसलं राजकारण?, मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू, मिटकरींकडू पुन्हा राज ठाकरे लक्ष

मुंबईतील निवडणूक शेवटच्या टप्प्यापर्यंत व्हायला पाहिजे होती. त्यानंतर त्यांचे उरलेसुरले कपडे सुद्धा आम्ही उतरवले असते. तुम्ही आमदार आणि खासदारांना खरेदी करू शकत असाल पण जीवाला जीव देणारे कार्यकर्ते खरेदी करू शकत नाही. धारावीच्या प्रकल्पावरुन सध्या बरंच राजकारण सुरू आहे. आमचं सरकार जर सत्तेत आलं तर आम्ही धारावी प्रकल्प रद्द करून टाकू अशी मोठी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube