Download App

संताप येणारच! पोलिसांनीच तरुणाच्या खिशात ठेवलं ड्रग्ज; सीसीटीव्हीनं सत्य केलं उघड..

राज्यात पोलिसांनी अंमली पदार्थांच्या विरोधात जोरदार मोहिम (Mumbai Police) सुरू केली आहे.

Mumbai Police : राज्यात पोलिसांनी अंमली पदार्थांच्या विरोधात जोरदार मोहिम (Mumbai Police) सुरू केली आहे. ड्रग्ज आणि अन्य अंमली पदार्थांच्या शोधासाठी छापे टाकून कारवाई केली जात आहे. गु्प्त माहितीच्या आधारेही कारवाई केली जात आहे. आता ही झाली एक बाजू पण जर पोलिसच (Maharashtra) कुणाच्या खिशात ड्रग्ज टाकून त्याला पकडत असतील तर.. होय असा संतापजनक प्रकार पोलिसांनीच केला आहे. या प्रकाराचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल (Social Media) होत असून पोलिसांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे मुंबई पोलिसांच्या प्रतिमेलाही तडा गेला आहे. खरंतर हे काम चार पोलिसांनी केलं आहे. या चार जणांमध्ये एक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन हवालदारांचा समावेश आहे.

या चौघांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एक माणसाच्या खिशात चार पोलीस ड्रग्ज ठेवताना दिसत आहेत. डमी आरोपी बनवण्यासाठी पोलिसांनी असे कृत्य केल्याचे दिसत आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या चारही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आता या व्यक्तीला संशयाच्या आधारावर ताब्यात घेण्यात आलं होतं. नंतर त्याला सोडून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Mumbai Airport : मोठी बातमी, मुंबई विमानतळावर 15 कोटींचे अंमली पदार्थ जप्त

व्हिडिओत काय दिसतंय

या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की एका गोठ्यात दोन पोलीस उभे आहेत आणि अन्य दोन पोलीस गोठ्यात काम करणाऱ्या व्यक्तीची झडती घेत आहेत. याचवेळी त्या व्यक्तीच्या पँटच्या खिशात एक पोलीस ड्रग्ज ठेवताना दिसत आहे. ही चीड आणणारी घटना कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत आहे. कायद्याचे रक्षकच जर असे कृत्य करू लागले तर विश्वास तरी कुणावर ठेवायचा असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मुंबईतील खार भागात 30 ऑगस्ट रोजी ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. गोठ्यात काम करणाऱ्या व्यक्तीला अंमली पदार्थ जवळ बाळगल्याच्या संशयावरून या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्या खिशात 20 ग्रॅम मेफेड्रोन सापडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. यानंतर घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करण्यात आले. मात्र या फुटेजने सत्य काय ते सांगून पोलिसांचच बिंग फोडलं. या व्यक्तीच्या खिशात पोलिसच काहीतरी ठेवत असल्याचे दिसत आहे. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे.

Mumbai मध्ये वादळी पावसाचा कहर; बॅनर कोसळल्याने मेट्रो ठप्प, प्रवाशांचे मोठे हाल

follow us