Raj Thackeray Criticize Congress and Demand to PM Modi : राज्यामध्ये लोकसभेच्या ( Lok Sabha Election ) चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचारार्थ आज मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. त्यावेळी राज ठाकरे ( Raj Thackeray ) आणि मोदी पहिल्यांदाच एका मंचावर आले. त्यावेळी त्यांनी मोदींसमोर आपल्या विविध मागण्याची यादी वाचून दाखवत कॉंग्रेसवर टीका केली.
राज ठाकरे म्हणाले की, मोदी मुंबईत अनेकदा आले मात्र 21 वर्षांपूर्वी ज्यावेळी ते शिवतीर्थावर आले होते. त्यावेळी तुम्ही कमळातून बाहेर आले होते. तर 2014 ला तुम्ही कमळ बाहेर काढलं. तसेच मी फक्त तीन टप्प्यावर बोलणार आहे. त्यातील मोदी यांची पहिली पाच वर्ष हा टप्पा झालेला आहे. त्यावर मी 2019 ला बोललो. तर गेली पाच वर्ष त्यावर मी बोलेल.
…आणि उद्धव ठाकरेंनी ‘ती’ घोषणा देणं बंद केलं; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
आता अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे शरद पवार आणि इतरांवर वेळ झालेला मात्र त्यांच्यावर बोलण्याची गरज नाही. कारण जे सत्य तेच येणार नाही. त्यांच्याबद्दल का बोलावं? मात्र काही गोष्टी अशा आहेत जसं की बाबरी मशीद प्रकरण हजारो कारसेवक उत्तर प्रदेशमध्ये मुलायम सिंग यादव यांच्या सरकारने पोलिसांनी ठार मारले. हे चित्र डोळ्यासमोर जात नाही. तेव्हा वाटलं की राम मंदीर होणारच नाही. पण मोदींनी ते केलं. 370 कलम हटवलं.
Chhota Bheem चा दमदार ट्रेलर रिलीज; जादुई दुनियेत होणार ‘दमयान’शी लढाई
राजीव गांधी ज्यावेळी पंतप्रधान झाले होते. त्यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने शहाबानो या महिलेच्या बाजूने दिलेले निकाल बहुमताच्या आधारावरती लोकसभेमध्ये हा निकाल बदलला होता. त्यामुळे ज्या बाईला न्याय मिळाला होता. तो काढून टाकला. मात्र मोदी यांनी ट्रिपल तलाक हा कायदा रद्द करून त्या महिले सह सर्व मुस्लिम महिलांना न्याय दिला.
राज ठाकरेंनी मोदींसमोर मांडली आपेक्षांची यादी
तर यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज ठाकरे यांनी आपेक्षांची यादी मांडली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जावा. तसेच देशावर सव्वाशे वर्ष राज्य करणाऱ्या मराठा साम्राज्याचा इतिहास देशातील शाळांमध्ये शिकवला जावा. तर तिसरी मागणी ही मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा. मुंबईच्या रेल्वे यंत्रणेवर जास्तीत जास्त लक्ष द्यावे, त्यासाठी निधी द्यावा, त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला तुम्ही कधीही हात लावणार नव्हता. मात्र, विरोधक तसा प्रचार करत आहेत. उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसला पाठिंबा देणारा मुठभर मुस्लिम हे कॉंग्रेसच्या आणि औवेसींसारख्यांच्या मागून दहशत पसरवत आहेत. त्यांचे आड्डे संपवावे त्यासाठी सैन्य देखील वापरावे. कारण मुस्लिम समाज देखील आपल्या बरोबर आहे. त्यामुळे हा देश कायमचा सुरक्षित करा, अशी अपेक्षाही राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.