Chhota Bheem चा दमदार ट्रेलर रिलीज; जादुई दुनियेत होणार ‘दमयान’शी लढाई

Chhota Bheem चा दमदार ट्रेलर रिलीज; जादुई दुनियेत होणार ‘दमयान’शी लढाई

Chhota Bheem and The Curse of Damyaan trailer out : ॲनिमेटेड छोटा भीम ( Chhota Bheem ) हे कार्टून आज देखील लहान मुलांमध्ये फेमस आहे. आपल्या बालपणात हे नाटक बघितलं नाही, अशी व्यक्ती मिळणं ही खूप कठीण आहे. तर आता कार्टून क्षेत्रामध्ये धुमाकूळ घालणारा छोटा भीम लवकरच आपल्याला आता रुपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज ( trailer out ) झाला आहे.

उद्धवजींचे चालणार नाही नखरे, आमच्यासोबत राज ठाकरे; आठवलेंची खास कविता स्टाईल टीका

‘छोटा भीम अँड द कर्स ऑफ दमयान’ या चित्रपटाचा ट्रेलर आज 17 मे रोजी रिलीज करण्यात आला. हा ट्रेलर अत्यंत खास आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर बच्चे कंपनी या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला आहे की, ढोलकपूरमध्ये छोटा भीम कशाप्रकारे सुपर व्हिलन दमयान याच्यापासून वाचतो.

या ट्रेलरमध्ये अभिनेते अनुपम खेर आणि मकरंद देशपांडे हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत असल्याचे दिसत आहे. 31 मे ला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये अनुपम खेर हे गुरु शंभू ही भूमिका साकारणार आहेत. जे या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला आहे की, कशाप्रकारे अनुपम खेर हे दमयानला श्राप देतात ज्यामुळे तू पातळ जातो मात्र तो काही दिवसाने पुन्हा ढोलक पूर्व उद्या आल्यानंतर संकट यायला सुरुवात होते. या संकटांमधून छोटा भीम ढोलकपूरला कसं वाचवतो हे पाहण्यासाठी आता आपल्याला फिल्म पहावी लागेल एवढं नक्की.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज