मुंबई: एेन दिवाळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटाचे नेते रामदास (Ramdas Kadam) कदम आणि खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kiritkar) यांच्यात जोरदार जुंपली होती. त्यात रामदास कदम यांनी गजानन कीर्तिकर यांच्यावर थेट वैयक्तिक पातळीवरून टीका केली होती. त्यामुळे या दोघांतील वाद आणखी टोकाला जाईल, असे वाटत होते. परंतु आता दोन्ही नेते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले आहेत. काल खासदार गजानन कीर्तिकर हे शिंदेंना भेटले होते. आज रामदास कदम हे मुख्यमंत्री शिंदेंना भेटले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना रामदास कदम हे नरमाईच्या भूमिकेत असल्याचे दिसले. परंतु शंभर टक्के वाद मिटला का ? यावर रामदास कदमांनी भाष्य केले आहे.
]
मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघावरून हे दोन ज्येष्ठ नेते आमने-सामने आले आहेत.कदम यांनी त्यांचा मुलगा सिद्धेश कदम याच्यासाठी या मतदारसंघावर दावा केला होता.त्यास गजानन कीर्तिकरांनी विरोध दर्शवला होता.त्यावर दोघांमध्ये जोरदार जुंपली होती. गजानन कीर्तिकर यांनी प्रसिद्धीपत्रक काढून रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याला रामदास कदमांनी त्याच पद्धतीने उत्तर दिले होते. रामदास कदमने कधीच गद्दारी केली नाही, उलट तुम्ही तुमच्या पत्नीशीही गद्दारी केली. पुण्याला काय शेण खायला जाता का? हे महाराष्ट्राला सांगू का मी? बोलू का? आम्हाला ते बोलायला लावू नका, अशी वैयक्तिक पातळीवर टीकाही रामदास कदमांनी केली होती.
Namdeo Jadhav : मीच रक्ताचा वंशज, सिंदखेड-राजाच्या वंशजांना 10 कोटींची नोटीस पाठवणार!
गजानन कीर्तिकर हे काल मुख्यमंत्र्यांनी भेटले होते. आज रामदास कदम हे मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना रामदास कदम म्हणाले,फुसके फटाके आणि दिवाळीतही शिमगा काही लोकांना पाहिला मिळाला आहे. तो भविष्यात दोघांकडून होता कामा नये. कालच खासदार गजानन कीर्तिकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून गेले आहेत. बाजू समजावून सांगितली आहे. भविष्यात आपसांत वाद-विवाद झाल्यास, मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्याकडे बोलायचे ठरले आहे. थेट प्रेस नोट काढून माध्यमांकडे जाऊ नये,अशी विनंती मी एकनाथ शिंदेंकडे केली आहे. तसा सूचना कीर्तीकर यांना देण्यात याव्यात, असे मी म्हटले आहे.
पुण्याचं ‘गुपित’ सांगण्याच्या रामदासभाईंच्या इशाऱ्याने कीर्तिकर घायाळ : म्हणाले, ‘नो कॉमेंट्स’
ज्याची जळते, त्याला कळते
मला गद्दार बोलणे चुकीचे आहे. माझा मर्डर करण्याची सुपारी घेतली होती. पक्षासाठी मी लढलो आगहे. मी निष्ठावंत शिवसैनिक आहे. कुठलेही शहानिशा न करता रामदास कदमांना संपविण्यासाठी प्रेस नोट काढण्यात आली.पत्रात चुकीचे आरोप लावले आहेत. कांदिवलीमधून ते तीस वर्षांपूर्वी माझ्यामुळे निवडून आले आहेत. मी खेडमध्ये निवडणूक लढविली. ३३ वर्षआंत ते शंभरवेळा माझ्याकडे जेवले आहेत. मी कधी कुणावर कंबरेखाली वार केले नाहीत. परंतु त्याचे जळते, त्यालाच कळते. परंतु भविष्यात एकमेंकावर आरोप, वार करायचे नाही, असे ठरले आहे. असे काही वाटले तर मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करायची आहे. माझ्याकडून तरी शंभर टक्के वाद मिटलेला आहे, असे रामदास कदमांनी म्हटले आहे.