Download App

काँग्रेस आमदारासाठी अजित पवार सरसावले, ‘या’ कारणासाठी मंत्रालयात घेतली विशेष बैठक

  • Written By: Last Updated:

मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्वच्या शिवालिक ट्रान्झिट कॅम्पमध्ये (Shivalik Transit Camp) 26 फेब्रुवारी रोजी लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या रहिवाशांचे त्याच ठिकाणी सुरक्षित घरांमध्ये तात्पुरते पूनर्वसन करण्यात यावे. तसेच वर्षभरात तेथेच नवीन ट्रान्झिट कॅम्प तयार करुन रहिवाशांच्या निवासाची सोय करावी. शिवालिक विकासकाने गेल्या 18 वर्षांत प्रकल्प पूर्ण न केल्याने त्याच्याऐवजी अन्य नामांकित विकासकांकडून हा प्रकल्प पूर्ण करुन रहिवाशांना न्याय मिळवून द्यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

खासदार निंबाळकर कडाडले; ‘भाईयो और बहनौ’ म्हणत थेट मोदींची खिल्ली 

शिवालिक ट्रान्झिट कॅम्पमध्ये 26 फेब्रुवारी आगीचा भडका उडाला. ही आग एवढी भडकली की या आगीत रहिवाशांचे मोठे नुकसान झाले. या आगीत अनेकांचा संसार उद्धवस्त झाला. दरम्यान, आता स्थानिक आमदार झिशान बाबा सिद्दीकी यांच्या मागणीवरुन मंत्रालयात आज विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे आदींसह संबंधित अधिकारी आणि शिवालिक ट्रान्झिट कॅम्प रहिवाशी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

BJP ला जिंकण्याचा विश्वास नसल्यानेच ते दुसऱ्या पक्षातील नेत्यांना चोरताहेत; नाना पटोलेंची जहरी टीका 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत, हा प्रकल्प पूर्ण होण्यास झालेला विलंब, प्रकल्पाच्या अंमलबजावणीत येत असलेल्या अडचणी, ट्रान्झिट कॅम्प रहिवाशांच्या समस्या, तेथील महिला, विद्यार्थी वर्गाच्या मागण्यांचा आढावा घेतला. त्यानंतर मार्गदर्शन करताना अजित पवार म्हणाले की, शिवालिक विकासकाकडून प्रकल्प पूर्ण होण्यास झालेला विलंब अक्षम्य आणि रहिवाशांवर अन्याय करणारा आहे. हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी संबंधित रहिवाशी आणि गृहनिर्माण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहमतीने अन्य चांगला विकासक शोधण्याच्या पर्यायाचा विचार करावा. त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करुन मान्यता घेण्यात यावी. 26 फेब्रुवारी रोजी लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या कुटुंबातील विद्यार्थी स्थानिक शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकतात. महिला स्थानिक ठिकाणी घरकाम करतात. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी रहिवाशांचे त्याच ठिकाणी उपलब्ध ट्रान्झिट कॅम्पमध्ये तात्पुरते पुनर्वसन करण्यात यावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन अपेक्षित निर्देश दिल्याने शिवालिक ट्रान्झिट कॅम्पच्या रहिवाशांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्थानिक आमदार झिशान बाबा सिद्दीकी यांचे आभार मानले.

follow us