खासदार निंबाळकर कडाडले; ‘भाईयो और बहनौ’ म्हणत थेट मोदींची खिल्ली

खासदार निंबाळकर कडाडले; ‘भाईयो और बहनौ’ म्हणत थेट मोदींची खिल्ली

Omraje Nimbalkar On Pm Modi : ‘भाईयो और बहनो म्हणत’ धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांची खिल्लीच उडवली आहे. ठाकरे गटाच्यावतीने राज्यभरात कुटुंब जनसंवाद जाहीर सभा पार पडत आहे. लातूरच्या औसानंतर आता उमरगामध्ये सभा पार पडली. यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

Ram Shinde VS Vikhe : तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्षांवर पडला भारी; राम शिंदेंचा पालकमंत्री विखेंना धक्का?

ओमराजे निंबाळकर म्हणाले, खोकापेटीच्या जमान्यात खोक्यांना लाथ मारण्याचं उदाहरण आमदार कैलास पाटील यांनी दाखवून दिलं आहे. सध्याच्या जगात निष्ठेचं थर्मामीटर असतं तर फुटाफूटी झाली नसती. उद्या कोणत्याही परिस्थिती आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी ठणकावून सांगितलं आहे.

भिंगार हायस्कूलला ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ प्रथम पुरस्कार; 11 लाख रुपयांचे पारितोषिक

तसेच यावेळी बोलताना शेतकऱ्यांच्या पीकाच्या भावावरुन केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. ‘भाईयो और बहनौ’ म्हणत थेट पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली आहे. निंबाळकर म्हणाले, आधीच्या सोयाबीनचा भाव 11 हजार होता. आता 6 हजार रुपये भाव आहे. तुम्ही आता ‘जय श्रीराम म्हणा’ जनतेने जय श्रीरामाच्या घोषणा दिल्यानंतर आता झाला का भाव पुन्हा 11 हजार? असा सवाल करीत निंबाळकर यांनी हल्लाबोल केला आहे.

तसेच आता मोदी सरकारने वर्षाला 2 कोटी नोकऱ्या दिल्या तर कोणीच बेरोजगार राहणार नाही. हाताला काम अन् मनात राम हे आमचं हिंदुत्व आहे. जेव्हा मोदीचा जन्म नव्हता त्यावेळी धाराशिवमध्ये बाळासाहेबांचा तीन वेळा खासदार होता. मागील निवडणूकीत मी 1 लाख 27 हजार मताने निवडून आलो यावेळी एक तरी मत जास्त घेऊन निवडून येईल तरच बाळासाहेबांचं शिवसैनिक ठरेल, असंही ओमराजे निंबाळकर म्हणाले आहेत.

दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक नेते पक्षांतर करीत आहेत. या परिस्थितीत धाराशिवमधून बाळासाहेबांचं नाव कोणीच हिरावून घेऊ शकत नाही, यापुढेही असंच काम सुरुच राहणार असल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी ठणकावून सांगितलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube