भिंगार हायस्कूलला ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ प्रथम पुरस्कार; 11 लाख रुपयांचे पारितोषिक
Ahmednagar News : राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानात भिंगार शहरातील अहमदनगर (Ahmednagar) एज्युकेशन सोसायटीची भिंगार हायस्कूल भिंगार शाळेला प्रथम पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारांतर्गत शाळेला 11 लाख रुपयांचं पारितोषिक मिळाले आहे. अभियानात शाळेला 99 गुण मिळाले आहेत.
44 वर्षांनंतर पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाकडून चूक मान्य, माजी पंतप्रधानांना फाशी देणं अयोग्यच
अभियाना दरम्यान शाळा व शाळेतील परिसर स्वच्छता, सुविचार लेखन, वृक्षारोपण या बरोबरच तंबाखूमुक्त, प्लास्टिकमुक्त या विषयावरही काम करण्यात आले आहे. या काळात महा वाचन, आरोग्य तपासणी, कोषल्याधिष्ठीत शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, विद्यार्थी मंत्रिमंडळ, परसबाग, एन.सी.सी. उपक्रम, अमृतवाटिका, पोषण आहार सहभाग, स्वच्छतादूत, बचत बँक असे उपक्रम राबवण्यात आले होते. या उपक्रमामध्ये इयत्ता 5 वी ते 12 वीच्या एकूण 1652 विद्याथ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता.
‘अजितदादा अन् शिंदेंचे उमेदवार ‘कमळावर’च लढणार’; बच्चू कडू यांचा मोठा दावा
विद्यार्थी मंत्रिमंडळ स्थापन करताना गुप्त मतदान पध्दतीचा वापर करून विद्यार्थ्यांना लोकशाहीतील मतदानाचा प्रत्यक्ष अनुभव दिला गेला. अभियाना दरम्यान शहरातील व भिगार गावातील आरोग्य क्षेत्रात काम करणारे डॉक्टर, पर्यावरण तज्ञ, सरपंच, बँकेतील अधिकारी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तज्ज्ञ मार्गदर्शक, क्रीडा क्षेत्रातील मार्गदर्शक, लेखक यांची व्याख्याने विद्याथ्यांसाठी आयोजित केली गेली. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अभय फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी आदींचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान, अभियानात विदयालयाचे पदाधिकारी, प्राचार्य पडोळे, उपप्राचार्य कासार, पर्यवेक्षिका व अभियानाच्या मुख्य निमत्रंक गायकवाड, सर्व शिक्षक, सेवक, विदयार्थी व पालक यांचा सक्रिय सहभाग असल्याने हे अभियान यशस्वी झाले आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ मधील कृती समितीत काम करताना विद्यार्थ्यांमध्ये संशोधकवृत्ती, वेळेचे योग्य नियोजन, सहकार्य, वाचन लेखन कौशल्य, स्वजाणीव, संवेदनशीलता, निसर्गप्रेम, जबाबदारी, नेतृत्व, आरोग्याबाबत जागरूकता इत्यादी गुणांचा विकास