शरद पवार-अजित पवार एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी पडद्यामागचं सांगितलं

शरद पवार-अजित पवार एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी पडद्यामागचं सांगितलं

Supriya Sule News : शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या राज्याच्या वर्तुळात चांगलीच रंगत असल्याचं दिसून येत आहे. अशातच कालच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर थेटपणे भाष्य करीत असं कधीच होणार नसल्याचा शब्दच कार्यकर्त्यांना दिला. त्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळेंनीही (Supriya Sule) एकत्र येण्याबाबतचं पडद्यामागचं सांगून टाकलं आहे. राष्ट्रवादी पक्षात आणि पवार कुटुंबात फूट नसल्याचं मोठं विधान केलं आहे. पुण्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Nepal : नेपाळमध्ये ‘चीन’ची एन्ट्री! जुनी युती तुटली; सरकारमध्ये PM प्रचंड अन् चीन समर्थकांची आघाडी?

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांच्या मनात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याची शंका व्यक्त केली जात होती. ही चर्चा दबक्या आवाजात सुरु असल्याची कुणकुण अजितदादांना लागल्यानेच अजित पवार यांनी या चर्चेला काल पूर्णविराम दिल्याचं दिसून आलं होतं. अजित पवार म्हणाले, हळूच दबकत दबकत विचारायचं दादा पुढे काही होईल का? लोकांच्या मनात अजूनही शंका आहेत, तर मी स्पष्ट सांगतो असं काहीही होणार नाही, असं स्पष्ट शब्दांत अजित पवार यांनी सांगून टाकलं आहे.

Harshwardhan Patil यांना इंदापूरमध्ये फिरू न देण्याची धमकी? पत्र लिहित घेतली शिंदे-फडणवीसांकडे धाव

आता शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्यावर सुप्रिया सुळे यांनी थेटपणे भाष्य करीत आपल्या कुटुंबात आणि पक्षात कोणतीही फूट पडली नसल्याचं म्हटलं आहे. तसेच आपल्याकडे लोकशाही असून प्रत्येकाला आपलं मन मोकळं करण्याचा अधिकार आहे. पवार कुटुंबात काय होतं हा खाजगी अधिकार आहे, त्यामुळे कौटुंबिक वेळेत ज्या चर्चा होतात त्या चर्चा कोणी सांगत नाहीत. कोण कोणाच्या बायकोशी काय बोलतं हे कोणी कोणाला सांगत नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

भाजपने सुरू केले देणगी अभियान, PM मोदींनी पार्टी फंडासाठी दिली ‘इतकी’ रक्कम

दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात चांगलाच संभ्रम निर्माण होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा ही शंका उपस्थित होईलच यात तीळमात्र शंका नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube