भाजपने सुरू केले देणगी अभियान, PM मोदींनी पार्टी फंडासाठी दिली ‘इतकी’ रक्कम

भाजपने सुरू केले देणगी अभियान, PM मोदींनी पार्टी फंडासाठी दिली ‘इतकी’ रक्कम

PM Modi Party fund : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज भारतीय जनता पार्टीला (BJP) पार्टी फंड (Party fund) म्हणून देणगी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी डोनेशन फॉर नेशन बिल्डिंग मोहिमेअंतर्गत भाजपला देणगी दिली आहे.पंतप्रधानांनी भाजपला 2000 रुपयांची देणगी दिली आहे आणि त्याची स्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे.

झिरो टू हिरो : आमदारकीचे तिकिट न मिळालेल्या तावडेंनी मोदींसह लोकसभेचे १९५ उमेदवार जाहीर केले… 

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींनी लिहिलं की, भाजपमध्ये योगदान देताना आणि विकसित भारताच्या उभारणीसाठी आमच्या प्रयत्नांना बळ देण्यात मला आनंद होत आहे. मी सर्वांना विनंती करतो की प्रत्येकांनी NaMoApp द्वारे राष्ट्र उभारणीसाठी देणगीचा एक भाग व्हावं.

पंतप्रधान मोदींशिवाय भाजपच्या इतर अनेक नेत्यांनी पक्षाच्या डोनेशन फॉर नेशन बिल्डिंग मोहिमेअंतर्गत देणगी दिली आहे.

Rajya Sabha Election : समाजवादीला फुटीचं ‘ग्रहण’, काँग्रेसलाही हादरे; ‘यूपी’तील क्रॉस व्होटिंगची स्टोरीही खास.. 

दरम्यान, भाजपच्या क्राउड फंडिंग अभियानाची सुरुवात राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी 1 मार्च रोजी केली होती. त्यांनी पक्षनिधीसाठी 1000 रुपये दिले होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट करत त्यांनी लिहिलं होतं की, भारताला विकसित भारत बनवण्याच्या पंतप्रधान मोदींच्या व्हिजनला माझा वैयक्तिक पाठिंबा देण्यासाठी मी भाजपला देणगी दिली. नोॲप वापरून आपण सर्वांनी DonationForNationBuilding या जन चळवळीत सहभागी व्हावं, असं आवाहन नड्डांनी केलं होतं.

इतकंच नाही तर पंतप्रधानांनी त्यांच्या पोस्टमध्ये NaMoApp ची लिंकही शेअर केली आहे. ज्याद्वारे जनता देखील पक्षाला देणगी देऊ शकते. या लिंकवर जाऊन कुणाही भाजपला थेट देणगी देऊ शकतं.

मोदी पुन्हा एकदा वाराणसीतून लढवणार

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी, भारतीय जनता पक्षाने शनिवारी 16 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. PM नरेंद्र मोदी पुन्हा एकदा वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे गांधीनगरमधून आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लखनऊमधून निवडणूक लढवणार आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube