Download App

मॉरिसभाईचं राजकीय कनेक्शन; कोणत्या नेत्यांशी संबंध?

Abhishek ghosalkar Murder Case : जुना वाद मिटवला…फेसबुक लाईव्ह केलं…अन् अखेरच्या संवादानंतर अचानक गोळ्यांची सरबत्ती करुन माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांना संपवण्याची घटना घडली. मॉरिस नरोन्हा नामक आरोपीने घोसाळकरांची गोळ्या झाडून हत्या केलीयं. ही त्या केल्यानंतर मॉरिसने स्वत:वरही गोळ्या झाडून आत्महत्या केलीयं. दरम्यान, मुंबईच्या दहीसरमध्ये अभिषेक घोसाळकरांची आणि मॉरिस नरोन्हाची ही भेट अखेरची भेट ठरलीयं. मात्र, या घटनेनंतर मॉरिस नरोन्हाची एकच चर्चा सुरु झाली आहे. मॉरिसचं राजकीय नेत्यांशी कनेक्शन असल्याचंही समोर आलंय. त्यामुळे मॉरिसचे नेमके कोणत्या नेत्यांसोबत हितगुजाचे संबंध होते. त्याबद्दल जाणून घेऊयात…

IND vs ENG : टीम इंडियाला धक्का! विराट, राहुल पाठोपाठ ‘हा’ स्टार फलंदाज मालिकेतून बाहेर?

मुंबईतील दहीसर-बोरिवली परिसरात मॉरिस स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून काम करीत होता. सामाजिक कार्याचा वसा असल्याने तो अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेत असतं. विशेष म्हणजे सर्वच पक्षांच्या नेत्यांसोबत त्याचे जवळचे संबंध होते. अलीकडच्याच काळातील त्याचे राजकीय नेत्यांची भेट घेतल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. मॉरिसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप खासदार गोपाळ शेट्टी, आमदार गीता जैन यांच्यासह इतरही राजकीय नेत्यांबरोबरचे जुने फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आहेत. मॉरिस कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नसला, तरी नेत्यांकडे त्याचे जाणे-येणे होते. आपल्या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी त्याने काही नेत्यांना आमंत्रित केले होते. यासोबतच उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, किशोरी पेडणेकरांची घेतलेली भेट, तर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेलाही त्याने समर्थन दिल्याचं पाहायला मिळालं.

“ज्यांनी माझी पाटी काढली त्यांना मीच महापौर केलं”; अजितदादांचा प्रशांत जगतापांवर हल्लाबोल

या घटनेनंतर भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गोळीबाराची घटना पूर्ववैमनस्यातून घडली असून रागावर नियंत्रण न ठेवल्याने गोळीबार झाला आहे. तर हत्येमागे कोणतंही राजकीय कारण नसल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी म्हटलं आहे. नूकतीच भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण ताजं असतानाच आता घोसाळकर गोळीबाराची घटना घडल्याने राज्यात गुंडांचं सरकार असून कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिला नाही, नेमकं चाललंय काय हेच कळत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

दरम्यान, अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच मॉरिसनेही स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. गोळीबारांच्या घटनांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अशा घटनांना राजकीय पाठबळ मिळतंय का? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून केला जात आहे. आता पोलिस प्रशासनाकडून तपासाची चक्रे फिरवण्यात येत आहेत. घोसाळकरांच्या हत्येमागे राजकीय शक्तीचा हात आहे का? हत्येचं खरं कारण काय आहे…याचा छडा लावण्याचं काम पोलिसांकडून सुरु आहे.

follow us