ठाणेः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरूच आहे. सोमवारीही आणखी चार रुग्णांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. या रुग्णालयात दोन दिवसांत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. मृतांमध्ये महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू असलेल्या एकाचा, तर आयसीयूमधील एका रुग्णालयाचा मृत्यू झाला आहे. तर एक रुग्णाला मृत अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले असल्याची येथील डॉक्टर सांगत आहेत.
या रुग्णालयात एका रात्रीत तब्बल 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली होती. यामध्ये 13 रुग्ण आयसीयूमधील, तर चार रुग्ण जनरल वॉर्डमधील होते. यातील अनेक जण वयोवृद्ध होते. तसेच त्यांना शेवटच्या क्षणी रुग्णालयात आणल्याचे येथील डॉक्टर सांगत आहेत.
धक्कादायक! रुग्णवाहिका न आल्याने राजभवनासमोरच रिक्षात महिलेची प्रसूती; बाळाचा मृत्यू
गुरुवारी रात्रीही पाच रुग्णांचा मृत्यू झाला झाला आहे. रुग्णालयातील रुग्णाची संख्या प्रचंड वाढलेली आहे. त्यामुळे उपचारासाठी डॉक्टर कमी पडत आहे. येथील रुग्णालयावर ताण आला आहे.
सखोल चौकशीसाठी समिती
या घटनांची सखोल चौकशी करण्यासाठी आरोग्य संचालकांच्या अध्यकतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे. या समितीच्या अहवालानंतर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी रविवारी जाहीर केले आहे.
ठाण्यातील रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी विरोधी पक्षही आक्रमक झाले आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी या हॉस्पिटमधील अनागोंदी कारभारावर आक्रमक पवित्र्या घेतला होता. येथील डॉक्टर व प्रशासनावर कडक कारवाई करण्याची मागणीही करण्यात आलेली आहे.