Sneha Pandit-Dube : विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) महायुतीचं कमळ सर्वत्रच फुलल्याचं आपल्या पाहायला मिळालं. प्रत्येक मतदारसंघात जनतेने महायुतीला भलतीच पसंत दिलीयं. या धामधूमीतच चर्चेत आला तो मुंबईतील वसई मतदारसंघ. कारण या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराने फक्त मुसंडीच मारली नाही तर 35 वर्षांपूर्वीचा बदला पूर्ण केलायं. भाजप उमेदवाराच्या सासऱ्यांची 35 वर्षांपूर्वी गोळीबारातून हत्या करण्यात आली. त्यानंतर मारेकऱ्यांचाच भाऊ या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीकडून रिंगणात होता. या मतदारसंघात या उमेदवाराची एवढी दहशत की 35 वर्षांत त्याला वरचढ ठरेल असा कोणीच नव्हता. मात्र, स्नेहा पंडित दुबे (Sneha Pandit-Dube) यांनी या उमेदवाराला त्याची जागा दाखवून आपला बदला पूर्ण केलायं. ही गोष्ट नेमकी कोणाची चाललीयं, प्रतिस्पर्धी उमेदवार कोण होता? 35 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात..
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस; अदाणी, मणिपूर प्रकरणारून विरोधक आक्रमक
वसई मतदारसंघाची निवडणूक का चर्चेत ठरली?
वसई मतदारसंघाला बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जायचं. या मतदारसंघात हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांची तब्बल 35 वर्षे एकहाती सत्ता होती. हितेंद्र ठाकूर हे सुरेश दुबेंचे मारेकरी जयेंद्र उर्फ भाई ठाकूर (Bhai Thakur) यांचे भाऊ आहेत. वसई भागात ठाकूर कुटुंबियांचं मोठं वलय आहे. त्यामुळे याही निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांचाच विजय होणार असल्याचं निश्चित मानलं जात होतं, मात्र भाजपकडून स्नेहा पंडित दुबे यांना उमेदवारी देण्यात आली. उमेदवारी देण्यामागचं कारणही तसंच होतं, 35 वर्षांपूर्वी जयेंद्र उर्फ भाई ठाकूर यांनी सुरेश दुबे यांची हत्या केली होती. हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात सुरेश दुबे यांच्या सुनबाई स्नेहा पंडित दुबे यांना रिंगणात उतरवण्यात आलं. निवडणुकीत स्नेहा यांनी 3200 मतांनी ठाकूर यांचा पराभव केलायं. हितेंद्र ठाकूर यांना 74 हजार 400 मते तर स्नेहा यांना 77 हजार 553 मते मिळाली आहेत.
35 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?
ही घटना आहे 9 ऑक्टोबर 1989 ची. याच दिवशी बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे नालासोपारा रेल्वे स्थानकावर वर्तमान पत्र वाचत होते. तर दुसरीकडे नागरिकांची रेलचेल सुरु होती. याचवेळी सुरेश दुबे यांचे मारेकरी तिथं शस्त्र घेवून दाखल झाले. सुरेश दुबे ज्या ठिकाणी होते तिथं पोहोचताच मारेकऱ्यांनी अवाक्षरही न काढता धडाधड गोळीबार केला. सुरेश दुबे यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर नालासोपारा रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली, त्याचवेळी प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची अफरातफरी माजली.
सुरेश दुबेंची हत्या का झाली?
सुरेश दुबे हे एक बांधकाम व्यावसायिक होते, त्यांच्याकडे मोक्क्याच्या ठिकाणाचा एक भूखंड होता. याच भूखंडावर जयेंद्र उर्फ भाई ठाकूर यांची नजर पडली. हा भूखंड मला हवायं, यासाठी भाई ठाकूरने दुबेंना अनेकदा धमकावलं, मात्र, सुरेश दुबे यांनी ठाकूरला थेट नकार देत धुडकावलं. त्यानंतर धमक्यांचं सत्र सुरु होतं, भाई ठाकूरच्या भीतीने काही दिवस सुरेश दुबे घराबाहेर पडत नव्हते, मात्र, एक दिवस ते नालासोपारा स्टेशनवर पोहोचले, आणि तो दिवस त्यांचा शेवटचा ठरला.
स्नेहा पंडित-दुबे कोण?
स्नेहा दुबे पंडित या समाजसेवक विवेक पंडित यांच्या कन्या असून लहानपणापासूनच त्यांना वडिलांकडून सामाजिक कार्याचे बाळकडू मिळालेले आहे. दुबे यांनी उच्च शिक्षण घेत विकीलीची पदवी मिळवली असून न्यायाधीश पॅनेलच्या सदस्या म्हणून त्यांनी काम पाहिलंय. स्नेहा दुबे पंडित यांनी श्रमजीवी संघटनेच्या कार्याध्यक्षपदाचा भार 2017 साली घेतला. सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवला. 2024 च्या निवडणुकीत त्यांना भाजपकडून वसई विधानसभेतून उमेदवारी देण्यात आली.
नांदेडमध्ये पाच महिन्यांत मोठी उलथापालथ! लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा विजय
लोकं बोलून दाखवत नव्हते – स्नेहा पंडित दुबे
वसई मतदारसंघातील मतदार बोलून दाखवत नसले तरीही प्रचाराच्या माध्यमातून मी लोकांमध्ये फिरत होते तेव्हा मला जाणवत होतं की वसईच्या लोकांना बदल हवाय. ही लढाई मी लढलेली नाही. ही लढाई वसईच्या जनतेने सुरू केली होती आणि वसईची जनता ही लढाई जिंकली असल्याची भावना दुबे यांनी व्यक्त केलीयं.
ठाकूर पिता-पुत्रांचा पराभव…
वसई मतदारसंघातून भाजप उमेदवार स्नेहा पंडित दुबे यांनी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हितेंद्र ठाकूर यांचा पराभव केला. तर हितेंद्र ठाकूर यांचा मुलगा क्षितिज ठाकूर यांचा नालासोपारा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राजन नाईक यांनी पराभव केलायं. नालासोपारा मतदारसंघातून क्षितिज ठाकूर चौथ्यांदा रिंगणात होते. याचदरम्यान, भाजपचे नेते विनोद तावडे कथित पैसे वाटप प्रकरणात क्षितिज ठाकूर चांगलेच चर्चेत आले होते.
दरम्यान, सुरेश दुबे यांच्या हत्येनंतर विवेक पंडित यांनी वसईतील नागरिकांच्या सहकार्याने श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन सुरुच ठेवलं. याचदरम्यान, राज्याची विधानसभा निवडणूक जाहीर झाली. सुरेश दुबे यांचे मारेकरी भाई ठाकूर यांचा भाऊ हितेंद्र ठाकूर यांचं वसईत चांगलंच अस्तित्व होतं. अशातच भाजपने स्नेहा पंडित दुबे यांना उमेदवारी दिल्याने हीच बदला घेण्याची संधी असल्याचं दिसून आलं. वसई मतदारसंघातून हितेंद्र ठाकूर यांना कोणीच हरवू शकत नाही, अशीच काहीशी परिस्थिती होती. मात्र, स्नेहा पंडित दुबे यांनी न होणारी गोष्ट करुन दाखवल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.