अजितदादांच्या पठ्ठ्याने शिंगणेंचा विधानसभेत जाण्याचा मार्ग रोखला, मनोज कायंदेंचा 4 हजार 650 मतांनी विजय…

  • Written By: Published:
अजितदादांच्या पठ्ठ्याने शिंगणेंचा विधानसभेत जाण्याचा मार्ग रोखला, मनोज कायंदेंचा 4 हजार 650 मतांनी विजय…

Sindkhedraja Vidhansabha Election Result : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) फारसं यश मिळालं नव्हतं. मात्र, विधानसभेला विदर्भात महायुतीने मुसंडी मारली आहे. विदर्भातील एकूण 62 विधानसभा मतदारसंघापैकी महायुतीला 50 जागा मिळाल्या आहेत. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) यांचा दारून पराभव झाला. मनोज कायंदे यांनी शिंगणेंचा 4 हजार 650 मतांनी पराभव केला.

नांदेडमध्ये पाच महिन्यांत मोठी उलथापालथ! लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा विजय 

सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत झाली. महाविकास आघाडीकडून डॉ. राजेंद्र शिंगणे, महायुतीकडून शिंदे गटाचे डॉ. शशिकांत खेडेकर, आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मनोज कायंदे रिंगणात होते. याशिवाय, वंचितकडून सविता मुंडे आणि अन्य 10 अपक्ष उमेदवारही मैदानात होते. दरम्यान, अगदी तिकीट वेळेवर मिळाल्यानंतरही मनोज कायंदे यांनी दमदार प्रचाराचे नियोजन केले. शेवटच्या दोन-तीन दिवसांत कायंदे यांची लाट निर्माण झाली. आज ही लाट विजयात परावर्तीत झाली आहे.

Wayanad By-Election Result: वायनाडमधून प्रियंका गांधींची राजकीय इनिंग सुरु, 4 लाख मतांनी विजयी 

पहिल्या काही फेऱ्यांमध्ये मनोज कायंदे 10 हजार मतांनी पिछाडीवर होते. पण ती आघाडी त्यांनी मोडून काढली. 25 व्या फेऱ्यांअंती मनोज कायंदे यांना 73 हजार 413 मतांनी विजयी झालेत. त्यांनी डॉ. राजेंद्र शिंगणेंचा 4 हजार 650 मतांनी पराभव केला.

डॉ. राजेंद्र शिंगणे यांना 68 हजार 763 तर तृतीय क्रमांकावर डॉ. शशिकांत खेडेकर यांना 60 हजार 635 मते मते मिळाली.

दरम्यान, मनोज कायंदे यांनी माध्यमांशी बोलतांना हा विजय जनतेला समर्पित केला, यावेळी कायंदे यांनी आपल्या दिवंगत वडिलांची आठवण येत असल्याचे माध्यमांशी बोलतांना सांगितले.

शिंगणेंचा राजकीय इतिहास काय?
डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी 1995 पासून तब्बल 5 वेळा यांनी सिंदखेड राजा मतदारसंघातून विजय मिळवून आपली एकहाती सत्ता कायम ठेवली. 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेचे डॉ.शशिकांत खेडेकर यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र, 2019 मध्ये ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर मोठ्या फरकाने विजयी झाले.
2019 च्या निवडणुकीत शिंगणे यांना 40.58% मते मिळाली होती, तर खेडेकर यांना 36.14% मते मिळाली होती वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube