Download App

गुजरातमध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ, वीज कोसळून 20 जणांचा मृत्यू, अलर्ट जारी

  • Written By: Last Updated:

20 killed in lightning: रविवारी राज्यभरात झालेल्या अवकाळी पावसानंतर आता देशाच्या इतर भागातही विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. अशातच आता गुजरातमधून एक हृदयद्रावक घटना बातमी समोर आली. गुजरातमध्ये अवकाळी पावसादरम्यान, वीज पडून 20 जणांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सोमवारी ही आकडेवारी जाहीर केली. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

Pooja Sawant : अभिनेत्री पूजा सावंतचा विंटर लूक, चाहते फिदा 

गुजरातमध्ये काल अवकाळी पावसाने जोरदार हेजरी लावली. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळं मनुष्यहानी झाली, शिवाय जनावरांचाही मृत्यू झाला. राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गुजरातच्या विविध भागात वीज पडण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. एकूण 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. राज्यात रविवारी झालेल्या तीव्र अवकाळी पावसाच्या दरम्यान, विजेच्या धक्काने हे मृत्यू झालेत.

Sa Re Ga Ma Pa 2023 Winner : अल्बर्ट लेप्चा ठरला ‘सा रे ग म प 2023’चा विजेता! म्हणाला, ‘सपना सच हो गया’ 

गुजरातमधील दाहोदमध्ये सर्वाधिक चार मृत्यू झाले आहेत. भरुचमध्ये तीन, तापीमध्ये दोन आणि अहमदाबाद, अमरेली, बनासकांठा, बोटाड, खेडा, मेहसाणा, पंचमहाल, साबरकांठा, सुरत, सुरेंद्रनगर, देवभूमी द्वारका येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

या घटनेनंतर प्रशासन सतर्क झाले असून शक्य त्या ठिकाणी बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही या दुर्घटनेची दखल घेतली आहे. शाह यांनी प्राण गमावलेल्या नागरिकांप्रती शोक व्यक्त केला आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी पोहोचण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. शाह यांनी ट्वीट करत लिहिलकी, गुजरातमधील विविध शहरांमध्ये खराब हवामान आणि वीज पडून अनेक लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातमीने मला खूप दु:ख झाले आहे. या आपत्तीत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. स्थानिक प्रशासन मदतकार्यात गुंतले आहे. जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना, अशा आशयाचं ट्वीट शाह यांनी केलं

SEOC नुसार, गुजरातमधील सुरत, सुरेंद्रनगर, खेडा, तापी, भरूच आणि अमरेली जिल्ह्यांमध्ये 16 तासांत 50-117 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सोमवारपासून पावसाचे प्रमाण हळूहळू कमी होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवला आहे.

मुसळधार पावसासोबतच ताशी 5 किमी वेगाने वारे वाहत आहेत. पावसामुळे दक्षिण गुजरातमधील मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सोमवारी पाऊस कमी होईल
पिकांच्या नुकसानीबरोबरच सौराष्ट्र विभागातील मोरबी जिल्ह्यातील सिरॅमिक उद्योगावरही पावसाचा परिणाम झाला. अचानक आलेल्या पावसामुळे कारखाने बंद ठेवावे लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. IMD च्या अहमदाबाद केंद्राच्या संचालक मनोरमा मोहंती यांनी सांगितले की, सोमवारी पाऊस कमी होईल.

Tags

follow us