Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : अखिल भारतीय मराठी साहित्याचा महामेळा आजपासून राजधानी दिल्लीत रंगणार आहे. यावर्षी दिल्लीत होत असलेल्या या साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तब्बल सात दशकांनंतर मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे. (Marathi ) दरम्यान, शरद पवार या संमेलनाचे स्वागताध्यक्ष तर मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे आहेत. डॉ. तारा भवाळकर या संमेलनाच्या अध्यक्ष आहेत.
मोठी बातमी! सरकारी, निमसरकारी आणि पालिकांमध्ये मराठी भाषा अनिवार्य
आज दुपारी साडेतीन वाजता दिल्लीत विज्ञान भवनात संमेलनाला सुरूवात होईल. 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान विविध साहित्यिक कार्यक्रम या संमेलनात होतील. संमेलनासाठी दोन कोटींचा अतिरिक्त निधी राज्य सरकारने मंजूर केलाय. साहित्य संमेलनासाठी राज्य सरकार दरवर्षी दोन कोटींचं अर्थसहाय्य करतं. मात्र दिल्लीतील खर्च लक्षात घेऊन अधिक निधीची महामंडळाची मागणी पूर्ण करण्यात आली आहे.
मोदी-पवार-फडणवीस एकाच मंचावर
दिल्लीत 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात होत असून पंतप्रधान मोदींच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. तर, डॉ. तारा भावळकर संमेलनाध्यक्ष तर शरद पवार संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत. दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधान मोदी, शरद पवार, मुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. देवेंद्र फडणवीस साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत.
संसदेपासून ग्रंथदिंडीस काढण्यास परवानगी
साहित्य संमेलनाच्या सुरुवातीला ग्रंथदिंडी निघते. यंदा या ग्रंथदिंडीस संसदेपासून प्रारंभ व्हावा, अशी आयोजकांची इच्छा होती. त्यास सशर्त परवानगी मिळाली आहे. संसद परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज व घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पाहार अर्पण करून ग्रंथदिंडीस प्रारंभ होणार आहे. नंतर ही दिंडी तालकटोरा मैदानाकडे जाईल. संसदीय सचिवालय व सुरक्षा व्यवस्था पाहणाऱ्या CISF नं ग्रंथदिंडीसाठी जास्तीत जास्त 20 लोकांना या परिसरात प्रवेश करण्यास परवानगी दिली आहे.
साहित्यीक एक्सप्रेसनं दिल्लीला रवाना
1200 साहित्यिक विशेष एक्सप्रेसनं दिल्लीला जाणार आहेत. मराठी भाषा विभागानं हा निर्णय घेतला आहे. एक्सप्रेसमध्येही साहित्य संमेलन रंगणार असून एक्सप्रसेच्या बोगीत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. एक्सप्रेसला महापराक्रमी महादजी शिंदे यांचे नाव देण्यात आलं आहे.