Bhopal Encounter : मध्य प्रदेशातील भोपाळमधून लव्ह जिहादची मोठी बातमी समोर आली आहे. यावर स्थानिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. हिंदू मुलींवर बलात्कार करणाऱ्या मुख्य आरोपीचा पोलिसांनी शॉर्ट एन्काऊंटर केला. (Encounter) आरोपीचं नाव फरहान असं आहे. तो हिंदू मुलींना ब्लॅकमेल करुन त्यांच्यावर अत्याचार करायचा. जिहादी व्हायचं त्याचं स्वप्न होतं.
फरहान हा पोलिसांच्या ताब्यात असताना पळून जाण्याच्या तयारीतमध्ये होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गोळी चालवली. त्याच्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला. हमीदिया हॉस्पिटलमध्ये फरहानवर उपचार सुरु आहेत. लव्ह जिहाद प्रकरणात एकूण ५ एफआयआर दाखल झाले आहेत. सर्वच प्रकरणातमध्ये फरहान हा आरोपी आहे.
पहलगामनंतरही पाकिस्तानच्या कुरापती; सीमावर्ती भागांमध्ये गोळीबार, भारतीय जवानांचं थेट उत्तर
फरहानने पोलीस उपनिरीक्षकाची पिस्तुल हिकसावून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी झटापट झाली आणि पोलिसाच्या बंदुकीतून गोळी सुटली. गोळी फरहानच्या पायाला लागली. जखमी आरोपी फरहानला तातडीने हमीदिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे.
अशोका गार्डनचे ठाण्याचे प्रभारी हेमंत श्रीवास्तव यांनी या घटनेची माहिती देताना म्हटलं की, काल शुक्रवार ही घटना घडली. रातीबड भागामध्ये फरहान टॉयलेटसाठी थांबला होता. तो गाडीतून उतरला तेव्हा पोलिस उपनिरीक्षक आणि पोलिस कॉन्स्टेबल त्याच्यासोबत गाडीतून उतरले. याचवेळी फरहानने सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हिकसावण्याचा प्रयत्न केला. त्याने पळून जाण्याचाही प्रयत्न केला, यावेळी झटापट झाली आणि गोळी फरहानच्या डाव्या पायावर लागली.