Building collapsed in Lucknow : लखनौ येथे एक बहुमजली इमारत कोसळल्याची (Building collapsed) दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर अन्य वीस जण जखमी झाले आहेत. या जखमींवर येथील लोकबंधू रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून, यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढू शकते. या इमारतीची डागडुजी सुरू असताना ही दुर्घटना घडली.
ज्योती क्रांती मल्टीस्टेटवर दरोडा: पिस्तुल, चाकूचा धाख दाखवून लाखोंचे दागिने, रोकड लुटली
इमारतीमध्ये अनेक औषध कंपन्यांचे गोदाम होते. यामध्ये अनेक कामगार होते. आतापर्यंत २८ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. अद्याप काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच चार एनडीआरएफ टीम, सहा एसडीआरएफ टीम आणि पाच अग्निशन दलाच्या टीम घटनास्थळी पोहोचल्या होत्या. रात्रभर ऑपरेशन सुरु होतं.
मदत कार्यासाठी ड्रोन्सचा वापरत करण्यात आला आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. लखनौचे डीएम सुर्यपाल गंगवार यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची भेट घेतली आहे. प्रत्येकाला योग्य उपचार मिळतील, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी सरकारने गडबडच केली; मनोज जरांगेंचं मोठं विधान
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली आहे. तसंच, संबंधित अधिकाऱ्यांना सर्व ती मदत करण्याचे आदेश दिले आहेत. आवश्यक असल्यास जखमींना इतर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मदत कार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
#WATCH | Uttar Pradesh: Visuals from the spot where 8 people died and 28 others have been injured after a building collapsed in Lucknow yesterday.
Rescue operations to evacuate the trapped people are underway. pic.twitter.com/IU47yWoYAU
— ANI (@ANI) September 8, 2024