Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार अपघाताच्या चार दिवसानंतर एअर इंडियाच्या (Air India) तब्बल 112 पायलटने अचानक रजा घेतली असल्याची माहिती संसदेत नागरिक उड्डाण राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, या अपघातानंतर सर्व फ्लीटच्या पायलटांच्या वतीने सिक लिव्हचे (Sick Leave) अर्ज वाढण्याचा प्रकार घडला होता. असं संसदेत बोलताना मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी सांगितले.
अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाच्या पायलटनी सामुहिक सिक लीव्ह घेतल्याच्या संदर्भात भाजपचे खासदार जय प्रकाश यांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देत 16 जून रोजी एकून 112 पायलट अजारी असल्याने सिक लिव्ह अर्ज केला होता अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली. या पायलटमध्ये 51 कमांडर्स ( पी1) आणि 61 फर्स्ट ऑफीसर ( पी 2) सामील होते असं देखील मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली.
या विमान अपघातानंतर नागरी उड्डयन महासंचालकांनी एका मेडिकल सर्क्युलरमध्ये एअरलाईन्सला फ्लाईटमध्ये क्रु आणि एअर ट्रफीक कंट्रोलर्सच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी असा सल्ला दिला होता.
Asia Cup 2025 होणार; ‘या’ देशात BCCI आयोजित करणार स्पर्धा
सर्वात मोठा विमान अपघात
12 जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान AI-171 ने टेकऑफ केल्यानंतर काही सेकंदात कोसळला होता. या विमानात क्रु मेंबर्ससह 241 प्रवाशी होते. या अपघातात 265 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप सरकारकडून याबाबत कोणताही अधिकृत आकडा जारी करण्यात आलेला नाही.