Download App

महाभयंकर ‘बिपरजॉय’ची गुजरातमधील विध्वंसानंतर आता राजस्थानमध्ये कूच…

Biparjoy Cyclone : अरबी समुद्रातून उठलेले चक्रीवादळ बिपरजॉय गुजरातच्या 940 गावांमधून ताशी 13 किमी वेगाने राजस्थानकडे सरकत आहे. बिपरजॉय चक्रीवादळ अखेर गुजरातमध्ये हजर झालं असून चक्रीवादळाने गुजरातमध्ये हाहाकार माजवला आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे जवळपास 22 नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. चक्रीवादळ धडकल्यानंतर अनेक झाडे, विजेचे पोल चक्रीवादळामुळे जमीनदोस्त झाली आहेत. गुजरातनंतर आता बिपरजॉय चक्रीवादळाने आता राजस्थानकडे वळण घेतलंय. त्यामुळे आता राजस्थानमधील लोकांना चांगलीच धडकी भरली आहे. (After the destruction of Gujarat, now Rajasthan will be hit)

बिपरजॉय चक्रीवादळामुळे आज आणि उद्या गुजरात आणि राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. गुजरातशिवाय आणखी चार राज्यांमध्ये या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येणार आहे. पुढील चार दिवस राजस्थान, पंजाब, हरियाणा, नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये जोराचा पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीय.


चक्रीवादळ येणार म्हणून गुजरातच्या नागरिकांच्या ह्रदयात चांगलीच धडकी भरली. चक्रीवादळाचा वेग ताशी तब्बल 145 किलोमीटर आहे. हे चक्रीवादळ धडकल्यानंतर गुजरातमध्ये लँडफॉल सुरु झालंय. द्वारका, कच्छ आदी किनारपट्टीवर झाडे, विजेचे पोल जमीनदोस्त झालेत.

ये फेविकॉल का जोड है…; जाहिरातबाजीनंतर शिंदेंनी केले फडणवीसांचे तोंडभरुन कौतुक

गुजरातमध्ये धडकलेल्या चक्रीवादळामुळे 524 झाडे, विजेचे खांब जमीनदोस्त झाले जवळपास 1000 गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला, असल्याची माहिती समोर आली आहे.बिपरजॉय चक्रीवादळ आता समुद्रातून जमिनीकडे सरकले असून ते सौराष्ट्र-कच्छच्या दिशेने केंद्रित झाले आहे. चक्रीवादळाची तीव्रता 105-115 किमी प्रतितास इतकी कमी झाली असल्याची माहिती IMD चे संचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिलीय.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून आणखी 23 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, 3 गाड्या शॉर्ट टर्मिनेशन करण्यात आल्या आहेत आणि 7 गाड्या शॉर्ट-ओरिजिनेटेड आहेत. यासह, एकूण 99 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, 39 गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत, तर 38 ट्रेन शॉर्ट-टर्मिनेटेड आहेत. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आलीय.

Tags

follow us