ये फेविकॉल का जोड है…; जाहिरातबाजीनंतर शिंदेंनी केले फडणवीसांचे तोंडभरुन कौतुक
Eknath Shinde On Devendra Fadanvis : गेल्या दोन दिवसांपासून शिवसेना व भाजपमध्ये जाहिरातीवरुन वार पलटवार सुरु होते. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच कार्यक्रमाला उपस्थित होते. तेव्हा त्यांनी फडणवीसांचे तोंडभरुन कौतुक केले. वर्षभरापूर्वी आम्ही मीठाचा खडा उचलून बाजूला फेकून दिला. देवेंद्रजींच्या अनुभवाचा राज्याला फायदा झाला. त्यांनी सुरु केलेले प्रकल्प नंतरचा सरकारने बंद केले,असे शिंदे म्हणाले.
ही युती स्वार्थसाठी झालेली नाही. ही युती सत्तेसाठी झालेली नाही. ही युती गेल्या 25 वर्षांपासून विचारांची आहे. देवेंद्रजींची आणि माझी गेल्या 15 ते 20 वर्षांपासून मैत्री आहे. ते देखील आमदार होते मी देखील आमदार होतो. आमची जीवाभावाची मैत्री आहे. कोणी किती प्रयत्न केला तरी आमचं बाँडिंग मजबूत आहे. ये फेविकॉल का जोड है टुटेगा नही, असे म्हणत त्यांनी फडणवीसांचे तोंडभरुन कौतुक केले.
तसेच फडणवीसांनी अर्थसंकल्प मांडून विरोधकांचं तोंड बंद केलं. देवेंद्रजी आणि मी कालही कार्यकर्ते होते, आजही कार्यकर्ते आहोत, आणि उद्याही कार्यकर्तेच राहणार. सत्तेची हवा आमच्या डोक्यात गेली नाही. आमचे पाय आजही जमिनीवर आहेत. घरातून बसून आदेश देणारे आमचे सरकार नाही. फेसबूक लाईव्ह करणारे आमचे सरकार नाही. फिल्डवर काम करणारं आमचं सरकार आहे, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना नाव न घेता टोला लगावला.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले
फडणवीस भाषणात म्हणाले, सीएम साहेब आणि मी हेलिकॉप्टरमधून उतरलो. त्यावेळी आमचा मीडियातला एक बंधू आला आणि म्हणाला तुम्ही दोघांनी एकत्रित प्रवास केला कसं वाटतंय? अरे आमचा एकत्रित प्रवास 25 वर्षांचा आहे पण, गेल्या वर्षभरात तो अधिक घट्ट आहे. त्यामुळे आमच्या प्रवासाची चिंता करण्याची कुणाला गरज नाही. तो कालही सोबत होता, आजही सोबत आहे आणि उद्याही सोबतच राहणार आहे. कारण, आम्ही सरकार तयार केलं खुर्च्या तोडण्यासाठी नाही, पद मिळवण्यासाठी नाही. हे सरकार जनसामान्याच्या जीवनात सामाजिक आर्थिक परिवर्तन झाले पाहिजे यासाठी स्थापन झाले आहे. त्यामुळे एखाद्या जाहिरातीने किंवा एखाद्याच्या वक्तव्याने सरकारमध्ये काही होईल इतकं हे सरकार तकलादू नाही, असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.
https://letsupp.com/maharashtra/maharashtra-devendra-fadnavis-speech-in-shinde-group-advertisement-57720.html
मागील 3 दिवसांपासून राज्याचे राजकारण वर्तमानपत्रातील दोन जाहिरातींभोवती फिरत आहे. यातील पहिली जाहिरात होती ‘देशात मोदी, राज्यात शिंदे’ असं सांगणारी आणि यातच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री म्हणून जनतेतील पसंतीच्या टक्केवारीच्या तुलनेची. या जाहिरातीवरुन प्रचंड वाद झाला. भाजपच्या नेत्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. फडणवीस यांनी त्यांचे दोन दिवसांचे दौरे रद्द केले.
MNS Vs NCP : राज ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत ‘नाग-कोंबड्यां’ची एन्ट्री
काय आहे जाहिरात वाद?
त्यानंतर दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात दुसरी जाहिरात झळकली. यात शिंदे आणि फडणवीस या दोघांचाही फोटो आणि दोघांच्या जोडीला जनतेचा आशीर्वाद असं सांगणारी. ही जाहिरात म्हणजे शिंदेंनी केलेले डॅमेज कंट्रोल असल्याचे बोलले गेले. तर केंद्रातील आणि राज्यातील भाजपच्या नेत्यांमुळे शिंदेंनी जाहिरात बदलली असा दावा विरोधकांनी केला. शिंदेंच्या गोटातून मात्र या दोन्ही चर्चांना फुलस्टॉप देत पहिली जाहिरात आम्ही दिलीच नव्हती, ती आमच्या हितचिंतकांनी दिली होती असा दावा करण्यात आला. तर दुसरी जाहिरात मात्र आम्ही दिली होती असं सांगण्यात आलं.