Download App

रुपाणींचा लकी नंबरच ठरला अनलकी, अभिमानानं मिरवला पण ‘तोच’ ठरला अखेरचा दिवस..

रुपाणी यांच्या आयुष्याशी संबंधित एक घटना आणि त्यांच्या मृत्यूच्या तारखेचा योगायोग समोर आला आहे.

Ahmedabad Plane Crash Vijay Rupani : अहमदाबादेत काल एअर इंडियाचे विमान कोसळून (Ahmedabad Plane Crash) मोठा अपघात झाला. या प्रवासी विमानातील तब्बल 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. या मयतांत गुजरातचे माजी मु्ख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) यांचाही समावेश आहे. ज्या इमारतीवर विमान कोसळलं त्या मेडिकल वसतिगृहातील 24 जणांचाही मृत्यू झाला. या विमानात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील प्रवास करत होते. या दुर्घटनेत त्यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या निधनावर देशभरातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. याच दरम्यान रुपाणी यांच्या आठवणींना उजाळा देताना एक योगायोगाची घटना समोर आली आहे. रुपाणी यांच्या आयुष्याशी संबंधित एक घटना आणि त्यांच्या मृत्यूच्या तारखेचा योगायोग समोर आला आहे.

विजय रुपाणी यांचं एका नंबरशी खास नात होतं. 1206 हा माझा लकी नंबर आहे असं रुपाणी नेहमी म्हणायचे. त्यांच्या पहिल्या स्कूटरच्या नंबर प्लेटचा नंबर देखील हाच होता. ही स्कूटर आजही त्यांच्या घरात आहे. यानंतर त्यांनी अनेक वाहनं खरेदी केली. या सर्व वाहनांचा नंबर देखील 1206 हाच होता. पण ज्या दिवशी अहमदाबाद-लंडन विमानाचा अपघात झाला त्या दिवसाची तारीखही 12-6-2025 अशीच होती. 12 जून ही तारीख त्यांच्या लकी नंबरशी जुळली. असा हा विचित्र योगायोग रुपाणी यांच्या बाबतीत घडून आला. लकी नंबरच त्यांच्यासाठी अनलकी ठरला. गुजरातमधील स्थानिक मीडियाने ही माहिती शेअर केली आहे.

Ahmedabad Plane Crash मधील मृतांच्या कुटुंबियांना टाटा ग्रुप कडून प्रत्येकी 1 कोटींची मदत जाहीर

मृतांच्या कुटुंबियांना एक कोटींची मदत

गुजरातच्या अहमदाबाद (Ahmedabad Plane Crash) येथील मेघानी नगर परिसरात 12 जून गुरुवारी दुपारी 1.30 च्या सुमारास एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले (Ahmedabad Plane Crash) असून या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) यांच्यासह विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचा दावा असोसिएडेट प्रेस या संस्थेने स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने केला आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना टाटा ग्रुपकडून प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

माहितीनुसार, बोईंग 787-8 ड्रीमलाइनर या विमानात 242 लोक होते, ज्यात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. ड्रीमलाइनर विमानने टेकऑफ केल्यानंतर लगेच कोसळला. याच विमानामध्ये कृ मेंबर असलेल्या अपर्णा महाडिक या राष्ट्रवादीचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भाचे सून असून या देखील याच विमानात होत्या.

घटनास्थळी (Ahmedabad Plane Crash) सध्या बचाव कार्य सुरु आहे. घटनास्थळी लष्कराचे 130 जवान बचावकार्याचे काम करत आहे. तर दुसरीकडे या अपघातामध्ये सर्व 242 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 51 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दादरी ते अहमदाबाद… देशातील दहा मोठे विमान अपघात

follow us