Download App

पाडव्याआधी ग्राहकांना धक्का, सोन्याच्या दरात आजही वाढ, जाणून घ्या नवीन दर

Gold Price Today : एकीकडे संपूर्ण राज्यात गुढीपाडवाची तयारी जोरात सुरु आहे तर दुसरीकडे सोने पुन्हा एकदा महाग झाल्याने ग्राहकांना मोठा धक्का

  • Written By: Last Updated:

Gold Price Today : एकीकडे संपूर्ण राज्यात गुढीपाडवाची तयारी जोरात सुरु आहे तर दुसरीकडे सोने पुन्हा एकदा महाग झाल्याने ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. सोने महाग (Gold Price Today) झाल्याने आता गुढीपाढवाच्या (Gudi Padhwa) दिवशी ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये (Delhi Gold Price)  10 ग्रॅम खरेदीसाठी ग्राहकांना 91,050 रुपये मोजावे लागत आहे तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या काही निर्णयांमुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळेच आता गोल्डमन सॅक्सने 2025 च्या अखेरीस  सोन्याची किंमत प्रति औंस 3,300 डॉलर्सपर्यंत पोहचू शकते असा अंदाज व्यक्त केला आहे. तर काही दिवसांपूर्वी जागतिक इन्व्हेस्टमेंट बँकेने सोन्याची किंमत प्रति औंस 3,100 डॉलर्सपर्यंत पोहचू शकते असा अंदाज वर्तवला होता.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर व्यापार धोरणांमुळे 2025 मध्ये आतापर्यंत सोन्याच्या किमतीत 15 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली आहे. तर आता आणखी काही दिवस सोन्याच्या दरात अशीच वाढ पाहायला मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच बाजारात सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

भाव वाढीचे कारण काय?

भारतासह गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारात देखील सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ पाहायला मिळत आहे आणि  पुढेही दरवाढीचा ट्रेंड सुरु राहील असा विश्लेषकांचा अंदाज आहे. मात्र भाव वाढीचे कारण काय आहे जे जाणून  घ्या.

मोदी सरकार आणणार नवीन योजना, ‘या’ लोकांचा होणार बंपर फायदा, जाणून घ्या सर्वकाही…

जागतिक पातळीवर आर्थिक अनिश्चितता कायम असल्याने तसेच सध्या जगातील अनेक देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढत असल्याने आणि अनेक देशात राजकीय तणाव असल्याने याच बरोबर अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे जगात व्यापार युद्धाचा धाोका वाढल्याने सोन्याच्या दरात सध्या वाढ पाहायला मिळत आहे.

follow us