Download App

फाईव्ह स्टार आश्रम, आलीशान गाड्या; हाथरसमधील भोले बाबांची संपत्ती तरी किती?

भोले बाबांच्या संपत्तीबाबत मोठी माहिती समोर आली. त्यांच्याकडे करोडो रुपयांची शेकडो एकर जमीन आणि 5 स्टार आश्रम आहेत.

Bhole Baba Property : हाथरस सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमध्ये 120 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली. मात्र, एफआयआरमध्ये (FIR) भोले बाबा उर्फ सूरज पाल (Suraj Pal) यांच्या नावाचा समावेश नाही. दरम्यान, आता भोले बाबांच्या संपत्तीबाबत मोठी माहिती समोर आली. त्यांच्याकडे करोडो रुपयांची शेकडो एकर जमीन आणि 5 स्टार आश्रम आहेत.

मोठी बातमी : शिंदेंनी टीम इंडियासाठी खुली केली तिजोरी; जगज्जेत्या संघाला 11 कोटींचं बक्षीस 

लोकांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे 24 आश्रमांचे मोठे नेटवर्क, आलिशान गाड्यांचा ताफा आणि किमान 100 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

13 एकर जागेवर आश्रम

उत्तर प्रदेशातील मैनपुरा येथे बाबांची 13 एकर जमीन आहे. त्याची किंमत चार कोटी रुपये आहे. या ठिकाणी बांधलेल्या आश्रमात अनेक खोल्या आहेत. यात पंचतारांकित हॉटेलसारख्या सुविधा आहेत. या आश्रमात सूरज पाल राहत होते. त्यांच्यासाठी 6 खोल्या होत्या. त्यात समितीच्या इतर सदस्यांसाठी 6 खोल्या होत्या. आश्रमासाठी खासगी रस्ता तयार करण्यात आला आहे. यात अत्याधुनिक कॅफेटेरिया आहे.

Nag Ashwin: दीपिकाच्या बेबीने ‘कल्की 2898’च्या जाहिरातीतही केले काम, दिग्दर्शकांनी केला खुलासा 

अनेक राज्यात आश्रम
मुख्य आश्रमाशिवाय उत्तर प्रदेशसह इतर राज्यांमध्येही बाबांचे आश्रम आहेत. बाबांचे कासगंज, आग्रा, कानपूर, शाहजहामपूर तसेच ग्वाल्हेर येथे आश्रम आहेत. बाबांचे आश्रम असलेल्या सर्व शहरांमध्ये वेगवेगळे ट्रस्ट आणि ट्रस्टी आहेत.

25 ते 30 आलिशान गाड्या
यासोबतच बाबांकडे आलिशान गाड्यांचा ताफाही आहे. भोले बाबा यांच्या ताफ्यात नेहमी 25 ते 30 आलिशान गाड्या नेहमीच असतात. बाबा स्वतः फॉर्च्युनर चालवतात.

देणगीदारांकडून मोठी देणगी…
बाबांना देणगी देणाऱ्या 200 मोठ्या देणगीदारांची यादी आश्रमाच्या गेटवर लावलेली आहे. या यादीत सर्वाधिक जमीन देणारे विनोद बाबू यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. देणगीदारांनी किमान 10,000 रुपये ते कमाल 2.5 लाख रुपये योगदान दिले आहे.

बाबांनी आपल्या सुरक्षेसाठी पुरुष आणि महिला रक्षक नेमल्याची बातमी अलीकडेच आली आहे. हे लोक एकाच प्रकारचे कपडे घालायचे. बाबांना प्रवचनस्थळी जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. बाबांच्या ताफ्याशिवाय कोणालाही रस्त्यावर येण्यास परवानगी नाही.

follow us