Download App

CBI ची मोठी कारवाई, NEET प्रकरणात आणखी एकाला अटक; वाचा सविस्तर

NEET UG Exam Scam : गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या NEET UG परीक्षा घोटाळा प्रकरणात (NEET UG Exam Scam) सीबीआयने (CBI) मोठी

NEET UG Exam Scam : गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या NEET UG परीक्षा घोटाळा प्रकरणात (NEET UG Exam Scam) सीबीआयने (CBI) मोठी कारवाई करत आणखी एकाला अटक केली आहे. माहितीनुसार, या प्रकरणात मोठी कारवाई करत सीबीआयने बुधवारी झारखंडमधील धनबाद येथून अमन सिंगला अटक केली आहे. सीबीआयने या प्रकरणात आतपर्यंत 7 जणांना अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारवर सीबीआयने ही कारवाई केली आहे.

तर दुसरीकडे 29 जून रोजी सीबीआयने या प्रकरणात झारखंडमधील हजारीबाग येथून एका हिंदी मीडिया संस्थेचे मार्केटिंग व्यावसायिक जमालुद्दीन अन्सारी याला देखील अटक केली होती तर 28 जून रोजी ओएसिस स्कूलचे मुख्याध्यापक एहसानुल हक आणि उपप्राचार्य इम्तियाज आलम यांना अटक केली आहे.

माहितीनुसार, NTA ने ओएसिस स्कूलचे मुख्याध्यापक एहसानुल हक यांची NEET-UG 2024 परीक्षेसाठी सिटी कोऑडीनेटर म्हणून नियुक्ती केली होती. माहितीनुसार, या आरोपींनी NEET उमेदवारांना प्रश्नपत्रिकेसाठी सुरक्षित जागा उपलब्ध करून दिली होती. आतापर्यंत सीबीआयकडून 6 एफआयआर नोंदवण्यात आले आहे. बिहारमध्ये दाखल करण्यात एफआयआर पेपर लीकशी संबंधित आहे तर गुजरात आणि राजस्थानमधून दाखल करण्यात आलेली एफआयआर फसवणूक आणि डमी उमेदवारांसंबंधित आहे.

रविवारी गुजरातमधून सीबीआयने गुजरातच्या गोध्रा जिल्ह्यातून एका खासगी शाळेच्या मालकाला अटक केली आहे. जय जलाराम शाळेचे मालक दीक्षित पटेल असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दीक्षित पटेलने उमेदवारांना मदत करण्यासाठी 5 ते 10 लाख रुपये घेतल्याप्रकरणी सीबीआयने अटक केली आहे.

पारनेर तालुक्यात गुंडाराज… हॉटेल चालकावर चॉपर तलवारीने वार

पटेल यांनी उमेदवारांना परीक्षेतील गुण वाढवण्याचे आश्वासन दिले होते तसेच जर उमेदवारांना कोणत्याही प्रश्नाचे उत्तर माहित नसेल तर प्रश्न सोडवू नका असे सांगितले होते. या आरोपीने परीक्षा संपल्यानंतर 27 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका भरणार होतो त्यासाठी त्याने प्रत्येक उमेदवाराकडून 10 लाख रुपये घेतले होते.

follow us