पारनेर तालुक्यात गुंडाराज… हॉटेल चालकावर चॉपर तलवारीने वार

पारनेर तालुक्यात गुंडाराज… हॉटेल चालकावर चॉपर तलवारीने वार

Ahmednagar News : गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar District) कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली आहे. यातच आता पारनेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

जेवणाचे बिल देण्याच्या कारणावरून हॉटेल चालक व हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांमध्ये वाद झाला. या वादातून हॉटेल चालकावरती  चॉपर तसेच तलवारीने जीव घेणे हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पारनेर तालुक्यातील (Parner Taluka) निघोज वडगाव रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पारनेर तालुक्यातील निघोज वडगाव रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये काही जण जेवण्यासाठी आले होते. त्यांचे जेवण झाल्यानंतर बिल देण्याच्या कारणावरून हॉटेल चालकाशी वाद झाला आणि या वादाचा रूपांतर थेट हाणामारीत झाला. या दरम्यान हॉटेल चालकावरती जेवण्यासाठी आलेल्या लोकांनी थेट चोपर व तलवारीने मारहाण केली.

या मारहाणीत हॉटेल चालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरती नगर शहरातील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. ही घटना मध्यरात्री घडली असून पारनेर पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

Champai Soren : मोठी बातमी! झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा राजीनामा

जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत आहे. जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच काही मुलांना मारहाण करत त्यांची नग्न दिंड देखील काढण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्या पाठोपाठ ही धक्कादायक घटना घडल्याने पुन्हा एकदा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज