Download App

अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस तरीही गुंतवणूकदार नाराज; ‘हे’ आहे कारण

Budget 2025 : लोकसभेत आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी 2025 साठी अर्थसंकल्प (Budget 2025) सादर केला आहे.

  • Written By: Last Updated:

Budget 2025 : लोकसभेत आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी 2025 साठी अर्थसंकल्प (Budget 2025) सादर केला आहे. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहे. याचबरोबर त्यांनी सर्वसामान्यांना आयकराबाबत मोठी सवलत देण्याची देखील घोषणा केली आहे मात्र तरीही देखील भारतीय शेअर बाजारात (Share Market) निराशा दिसून येत आहे.

आज भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) घसरणीसह बंद झाले. आज सेन्सेक्स 77,505.96 वर आणि निफ्टी 23,482.15  वर बंद झाला. त्यामुळे अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा होऊन देखील शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

तर दुसरीकडे तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आयकरात सूट आणि विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीची (FDI) मर्यादा वाढवल्याने एफएमसीजी आणि विमा क्षेत्र मजबूत होतील अशी अपेक्षा होती त्यामुळे आज सकाळी बाजारात तेजी पाहायला मिळाली पण त्यानंतर अनेक विमा क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली.

बाजारातील तज्ज्ञांच्या मते, भांडवली खर्चाच्या बाबतीत बाजार निराश झाला आहे, ज्यामुळे पॉवर आणि डिफेन्स सारख्या प्रमुख निर्देशांकांमध्ये घसरण झाली आहे. याशिवाय, नफा बुकिंगमुळे आज बाजारात शांतात पाहायला मिळाली.  2026 च्या आर्थिक वर्षासाठी भांडवली खर्च अंदाजापेक्षा कमी राहिल्यामुळे संरक्षण, रेल्वे आणि वीज यासारख्या क्षेत्रात निराशा पाहायला मिळाली. त्यामुळे पॉवर ग्रिड, एल अँड टी, एनसीसी, जेएसडब्ल्यू एनर्जी, एबीबी, आयआरएफसी, आयआरकॉन आणि आरव्हीएनएल यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर आयकरात सूट मिळाल्यामुळे एफएमसीजी आणि पर्यटन शेअर्स ग्रीन झोनमध्ये दिसून आले. आज ट्रेंट, अव्हेन्यू सुपरमार्ट, आयटीसी, वेस्टलाइफ आणि झोमॅटोच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.

74 मिनिटे भाषण अन् चक्क 51 वेळा ‘टॅक्स’ तर 26 वेळा ‘टीडीएस’ चा उल्लेख, अर्थमंत्र्यांनी कोणता शब्द किती वेळा उच्चारला?

ऑटो शेअर्स चमकले

तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की आयकरात सवलतीमुळे लोकांच्या हातात अधिक पैसे राहतील, त्यामुळे वापर वाढेल आणि एफएमसीजी कंपन्यांना याचा सर्वाधिक फायदा होईल. त्याच वेळी, ऑटो क्षेत्रालाही याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे आणि या अपेक्षेसह, प्रमुख ऑटो कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रा यांच्या शेअर्सना चांगली वाढ मिळाली.

follow us