लोकसभा निवडणुकीला अजून एक वर्षाचा अवधी शिल्लक आहे, मात्र केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष या निवडणुकांसाठी आतापासूनच सक्रिय झाला आहे. यासाठी भाजपकडून खासदारांचा लेखाजोखा तयार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर, 2024 च्या निवडणुकांपूर्वीच भाजपच्या खासदारांची परीक्षा सुरू झाली असून, भाजपच्या खासदरांना लेखाजोखा देण्याचे पक्ष श्रेष्ठींकडून आदेश देण्यात आले आहे. यासाठी राजधानी दिल्लीतून फॉर्मदेखील रवाना करण्यात आले आहेत.
दोन सर्व्हेमध्ये पिछाडीवरील फडणवीस आले आघाडीवर; भाजप स्वबळावर गाठणार सव्वाशेचा आकडा
पाठवण्यात आलेल्या या फॉर्ममधून जनसंपर्क अभियानात तुम्ही किती काम केले आणि किती घरांपर्यंत पोहोचलात, अशी विचारणा करणारे 2 पानांच्या नोटसह 3 फॉर्म पाठवले आहेत. खासदारांना हा फॉर्म भरून राज्य कार्यालयात किंवा दिल्लीतील संसदीय कार्यालयात जमा करावा लागणार आहे.
जनसंपर्क अभियानात खासदार किती घरांमध्ये पोहोचले, त्यांनी आपापल्या क्षेत्रात किती काम केले, असे प्रश्न या फॉर्मच्या माध्यमातून खासदारांना विचारण्यात आले आहेत. यासोबतच खासदारांना पुढील टार्गेटही देण्यात आले असून, 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत तिकीट वाटपातही हे फॉर्म महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याची चर्चा आहे.
Suahma andhare : ‘मनीषा ताई, तुमची पक्ष सोडण्याची कारणे…’ ‘ते’ पत्र दाखवत अंधारेंची कायदेंवर टीका
100-100 मीडिया इन्फ्लुएंसरची यादी मागवली
खासदारांना त्यांच्या संबंधित लोकसभा मतदारसंघात 100-100 सोशल मीडिया इन्फ्लुएंसरची यादीदेखील पाठवण्यास सांगण्यात आले आहे. तसेच त्यांची परिषद आयोजित करावी लागणार आहे. यात कोण किती प्रभावशाली भाजपसाठी लिहितात, कोण वाईट आणि किती लोक तटस्थ राहतात हेही सांगावे लागणार आहे.
याशिवाय सर्व खासदारांना त्यांच्या लोकसभेतील 1000 विशेष लोकांची यादी द्यावी लागणार आहे. यामध्ये पद्म पुरस्कार विजेते, खेळाडू, शिक्षक, डॉक्टर आणि शहीदांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. यासोबतच त्यांना त्यांच्या परिसरात 40 ते 50 कार्यकर्त्यांची टीम तयार करायची आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला दररोज सकाळी 20 लोकांशी आणि संध्याकाळी 20 लोकांशी म्हणजे दिवसातून किमान 40 लोकांशी संपर्क साधावा लागणार आहे. यावेळी मोदी सरकारच्या 9 वर्षांच्या कामांची माहिती देताना त्याची एक
पुस्तिकाही द्यावी लागणार आहे.
‘शिंदे गुवाहाटीत नव्हे अयोध्येत करणार होते बंड’; ठाकरे गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट
योग दिनाला मोठा कार्यक्रम करा, फोटो अपलोड करा
येत्या 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन भारतासह संपूर्ण जगात साजरा केला जाणार आहे. यासाठीदेखील भाजपच्या सर्व खासदारांना विशेष आदेश देण्यात आले आहे. यात खासदारांनी आपल्या भागात किती परिषदा घेतल्या आणि त्यात विविध घटकांचा किती सहभाग होता, हेही फॉर्ममध्ये सांगायचे आहे. विशेषतः लाभार्थी, व्यावसायिक आणि सामाजिक स्तरावर आयोजित केलेल्या संमेलनांना किती लोक उपस्थित होते, याचीही माहिती खासदारांना देण्यास सांगण्यात आले आहे.
‘शिंदे गुवाहाटीत नव्हे अयोध्येत करणार होते बंड’; ठाकरे गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट
देण्यात आले पुढील टार्गेट
भाजप खासदारांना त्यांच्या आतापर्यंतच्या कामाबद्दल सांगण्याबरोबरच त्यांच्यासाठी पुढील लक्ष्यही ठेवण्यात आले आहेत. पक्षाने जारी केलेल्या सूचनांनुसार, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्व खासदारांनी आपापल्या भागात 1000 ते 2000 कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सांगण्यात आले असून, योग दिनाला मोठा कार्यक्रम आयोजित करण्याबरोबरच त्याचे फोटो सरल अॅपवर डाउनलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.