Suahma andhare : ‘मनीषा ताई, तुमची पक्ष सोडण्याची कारणे…’ ‘ते’ पत्र दाखवत अंधारेंची कायदेंवर टीका
Suahma Andhare : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदार प्रा. मनीषा कायंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रेवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना मनीषा कायंदे म्हणाल्या, देवी-देवतांचा अपमान करणाऱ्यांचं आणि देवी बसली, असं म्हणून देवीचा अवमान करणाऱ्यांचं आता टीव्हीवर ऐकावं लागत आहे. यावेळी बोलताना त्यांनी सुषमा अंधारवर थेट टीका केली. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी देखील मनीषा कायंदे यांच्यावर गंभीर आरोप करणारं शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांचं पत्र व्हायरलं करत कायंदे यांच्यावर टीका केली होती. (Suahma Andhare Criticize Manisha Kyande on Rahul Shewale Letter )
PM मोदी अमेरिका दौऱ्यावर; निवडणुकांपूर्वी बायडेनकडून भारतीयांना मिळणार मोठे गिफ्ट
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
हे पत्र ट्विट करत अंधारे यांनी कायंदे यांना त्यांच्या पक्ष सोडण्याच्या कारणावरून सवाल करत, कायंदे यांच्य पक्ष सोडण्याचं खरं कारण सांगितलं आहे. सुषमा अंधारेंनी या ट्विट मध्ये लिहिले की, ‘मनीषाताई, तुमची पक्ष सोडण्याची कारणे दोन दिवसापूर्वी झालेली 40 कोटीची फाईल आणि हे राहुल शेवाळे यांनी फडणवीस यांना चौकशीसाठी लिहिलेले पत्र हे जास्त महत्त्वाचे आहे. तुम्हाला आठवतंय ना? नागपूर अधिवेशनाच्या वेळी हे तुम्हीच मला दिलं होतं.’ यामध्ये त्यांनी हे पत्र देखील दिलं आहे.
मनीषाताई, तुमची पक्ष सोडण्याची कारणे दोन दिवसापूर्वी झालेली 40 कोटीची फाईल आणि हे राहुल शेवाळे यांनी फडणवीस यांना चौकशीसाठी लिहिलेले पत्र हे जास्त महत्त्वाचे आहे. तुम्हाला आठवतंय ना? नागपूर अधिवेशनाच्या वेळी हे तुम्हीच मला दिलं होतं. @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @KayandeDr pic.twitter.com/gpbhTqdIxw
— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) June 19, 2023
काय आहे हे पत्र?
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी मनीषा कायंदे या ठाकरे गटामध्ये असताना त्यांच्यावर गंभीर आरोप केलेलं एक पत्र उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिले होते. यामध्ये त्यांनी विधानपरिषद आमदार मनीषा कायंदे यांच्याकडून होत असलेल्या ब्लॅकमेलिंगग आणि धमकी करिता केलेल्या गुंड टोळीच्या वापराबाबत चौकशी व्हावी अशी मागणी या पत्रामध्ये राहुल शेवाळे यांनी केली होती. त्यानंतर आता मनीषा कायंदे या शिंदे गटात गेल्याने सुषमा अंधारे यांनी हे पत्र व्हारल करून या आरोपांमुळेच आपण शिंदे गटात गेल्या आहात का? असा सवाल कायंदे यांना केला आहे.