PM मोदी अमेरिका दौऱ्यावर; निवडणुकांपूर्वी बायडेनकडून भारतीयांना मिळणार मोठे गिफ्ट
PM Modi America Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चार दिवसांचा अमेरिका दौरा आज (दि.२१) जूनपासून सुरू झाला आहे. मोदींचा हा दौरा भारतासाठी अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाचे करार होणार आहेत. मोदींच्या या दौऱ्यासाठी अमेरिकेतील अनिवासी भारतीयदेखील मोठ्या प्रमाणात उत्साही आहेत. PM मोदी 21 जून ते 24 जून या कालावधीत अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, 22 जून रोजी मोदी अमेरिकन संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. अमेरिकेच्या संसदेला दोनदा संबोधित करणारे ते भारताचे पहिले पंतप्रधान असणार आहेत. यापूर्वी 2016 मध्ये मोदींनी अमेरिकन संसदेला संबोधित केले होते. चर्चिल आणि मंडेला यांच्यासारख्या जगातील काही नेत्यांनी अमेरिकन संसदेला दोनदा संबोधित केले आहे. त्यानंतर अमेरिकन संसदेत संबोधित करणारे मोदी हे जगातील तिसरे नेते ठरणार आहेत.
‘डॉक्टर एकनाथ शिंदेंमुळे गळ्यातला पट्टा गेला, चालायला लागले’
मोदींच्या दौऱ्यात या गोष्टी ठरणार लक्षवेधी
भारताच्या पंतप्रधानांच्या सन्मानार्थ व्हाईट हाऊस येथे गार्ड ऑफ ऑनर आणि मेजवानीचे आयोजन केले जाणार आहे. येथे महत्त्वाची मानली जाणारी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चाही होणार असून, यावेळी संरक्षण आणि तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक मोठे करार होण्याची शक्यता आहे. जेट इंजिन डीलमुळे भारतीय एरोस्पेसला अनेक फायदे होणार असून 3 अब्ज डॉलरचा ड्रोन करार भारतासाठी गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे.
Sanjay Raut : ईडीने नुसते डोळे वटारले तर पक्षांतर केलं, कुठल्या नोटीसची गोष्ट करता; राऊतांचा टोला
भारतासाठी महत्त्वाचा आहे अमेरिकेचा दौर
चीनच्या कुरघोड्यांचा सातत्याने त्रास देणाऱ्या चीनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताला अमेरिकेकडून घातक शस्त्रे आणि त्याचे तंत्रज्ञान हवे आहे. मोदींच्या अमेरिका भेटीदरम्यान, अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिकच्या GE-F414 इंजिनचे तंत्रज्ञान भारताच्या स्वदेशी लढाऊ तेजस MK-2 साठी भारतात हस्तांतरित केले जाऊ शकते. मोदी सरकारच्या आत्मनिर्भर योजनेंतर्गत स्वदेशी लढाऊ विमान तेजस मार्क-2 ची ताकद वाढवण्यासाठी भारतात GE-F414 इंजिनचे उत्पादन केले जात आहे. लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट मार्क-1 देखील जनरल इलेक्ट्रिकचे एफ-404 इंजिन वापरते.
‘शिंदे गुवाहाटीत नव्हे अयोध्येत करणार होते बंड’; ठाकरे गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट
3 अब्ज डॉलरचा संरक्षण करार
या दौऱ्यामध्ये मोदी अमेरिकेसोबत ३ अब्ज डॉलर्सचा मोठा संरक्षण करार करणार आहे. या अंतर्गत भारताला अमेरिकन कंपनी जनरल अॅटोमिक्सकडून MQ 9B सी गार्डियन ड्रोन मिळणार आहेत. हे जगातील सर्वात घातक ड्रोन मानले जाते. तो कोणत्याही हवामानात 30 तासांपेक्षा जास्त काळ उपग्रहाद्वारे उड्डाण करू शकतो. याशिवाय हे ड्रोन रिअल-टाइम फोटो गोळा करू शकते आणि विश्लेषणासाठी ग्राउंड स्टेशनवर पाठवू शकते.
During his visit to New York, USA, PM Narendra Modi will meet around 24 people, including Nobel laureates, economists, artists, scientists, scholars, entrepreneurs, academicians, health sector experts, and more.
PM will be meeting Tesla co-founder Elon Musk, Astrophysicist Neil… pic.twitter.com/BiIkofRjFd
— ANI (@ANI) June 20, 2023
न्यू जर्सी रेस्टॉरंटमध्ये पीएम मोदींच्या नावाची खास डिश
पंतप्रधानांच्या यूएस दौऱ्याआधी न्यू जर्सी येथील एका रेस्टॉरंटने त्यांच्या सन्मानार्थ खास थाळी सादर केली आहे. एडिसन, न्यू जर्सी येथील अकबर रेस्टॉरंटने पंतप्रधानांच्या भेटीच्या स्मरणार्थ “मोदी थाली’ लाँच केली आहे. “आम्ही येथे 30 वर्षांपासून आहोत. पण आता आम्ही खास थाळी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मोदींचा अमेरिका दौरा असल्याचे रेस्टॉरंटचे मालक प्रदीप मल्होत्रा यांनी सांगितले.