Boyfriend Shot Dead Girlfriend In Uttar Pradesh : प्रेयसीचं लग्न ठरल्याने प्रियकर (Boyfriend) संतापला. त्याच्या डोक्यात सैतान भरला अन् त्यानं भररस्त्यात प्रेयसीला संपवलं. ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. बिजनौरमध्ये प्रेयसीची (Girlfriend) गोळ्या घालून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. घटनेनंतर आरोपी प्रियकराने पिस्तूलसह पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. त्याचवेळी, घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तरूणीटा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच, हत्येच्या कारणांबाबत आरोपींची चौकशी (Uttar Pradesh) सुरू करण्यात आली आहे. दिवसाढवळ्या गोळीबार करून खून केल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
बिजनौरच्या कोतवाली पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या करोंडा चौधर गावात एका तरुणाने आपल्या प्रेयसीची गोळ्या घालून हत्या केली. आरोपी प्रियकर शिवन त्यागी हा त्याच गावातील निशूसोबत कॉलेजमध्ये शिकत होता. या काळात दोघेही एकमेकांच्या प्रेमात (Uttar Pradesh Crime) पडले. दोघांनीही एकमेकांसोबत प्रेमाने जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली. परंतु तरूणीच्या कुटुंबाने तिचे लग्न दुसरीकडे कुठेतरी निश्चित केले होते. लग्नाची तयारी जोरात सुरू होती.
एक वाटी आमरस अन् मोदक खाण्यासाठी दीड कोटी, शेतकऱ्यांना 1 रूपयाही नाही; राजू शेट्टी आक्रमक
दरम्यान, रविवारी आज ती वडिल आणि बहिणीसोबत खरेदीला जात होती. त्यानंतर गावाजवळील बधापूरमध्ये शिवन त्यागीने आपल्या प्रेयसीच्या मागून गोळी झाडली. घटनेनंतर निशूला तातडीने सार्वजनिक आरोग्य केंद्रात नेण्यात (Boyfriend Shot Dead Girlfriend) आले, तिथे डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. यावेळी शिवन त्यागी हातात बंदूक घेऊन पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला आणि फिल्मी शैलीत आत्मसमर्पण केले. प्रेयसीची हत्या केल्याची कबुली दिली.
उद्धव ठाकरे मनसैनिकांची माफी मागणार का? संदीप देशपाडेंचा थेट सवाल…
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तरूणीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच, आरोपीची चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय की, आरोपी त्याच्या प्रेयसीच्या लग्नामुळे नाराज होता. म्हणूनच त्याने हे धक्कादायक पाऊल उचललं. घटनेची माहिती मिळताच एसपी सिटी संजीव कुमार बाजपेयी आणि सीओ नगीना घटनास्थळी पोहोचले.
त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच, आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. या संपूर्ण घटनेमुळे गावात आणि परिसरात शांतता आहे. लगीनघरी शोककळा पसरली आहे. शिवन त्यागी असं आरोपीचं नाव असल्याची माहिती टीव्ही नाईनच्या हवाल्यानुसार मिळतेय.