‘The Girlfriend’ चित्रपटातील रश्मिकाचा फर्स्ट लूक आऊट! अभिनेत्रीनं शेअर केला खास व्हिडीओ
The Girlfriend First Look Out: आघाडीची दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) आज करोडो प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आहे. तिचं फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. भारतात तिचे करोडो चाहते आहेत. तर ‘पुष्पा’ चित्रपटातील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं. यातच ‘द गर्लफ्रेंड’ (The Girlfriend First Look ) या चित्रपटामधील रश्मिकाचा (Rashmika Mandana) फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्याची घोषणा खुद्द अभिनेत्रीने केली आहे.
View this post on Instagram
‘द गर्लफ्रेंड’ हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ज्याची घोषणा खुद्द अभिनेत्रीने केली आहे. या चित्रपटामध्ये ती एका अनोख्या अंदाजात दिसणार आहे. राहुल रवींद्रन दिग्दर्शित हा चित्रपट प्रेम कहाणीवर आधारित असणार आहे. ‘नॅशनल क्रश’ रश्मिकानं नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) शेअर केला आहे.
या व्हिडीओत रश्मिकाचा ‘द गर्लफ्रेंड’ या चित्रपटामधील हटके लूक बघायला मिळत आहे. व्हिडीओत रश्मिका ही पाण्याच्या आत दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला ती स्माईल करत असल्याचे बघायला मिळत आहे तर व्हिडीओच्या शेवटी रश्मिकाच्या चेहऱ्यावर गंभीर हावभाव दिसत आहेत.
Deva Release Date: शाहिद कपूरचा ‘देवा’ सिनेमातील फर्स्ट लूक प्रदर्शित
रश्मिकानं ‘द गर्लफ्रेंड’ या चित्रपटाचा खास व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “जग महान प्रेम कथांनी भरलेले आहे. पण अशा काही प्रेमकथा आहेत ज्या याअगोदर कधीही ऐकल्या नाहीत किंवा पाहिल्या नाहीत आणि ‘द गर्लफ्रेंड’ ही अशीच एक असणार आहे.
‘द गर्लफ्रेंड’ व्यतिरिक्त अभिनेत्री रश्मिका मंदान्ना लवकरच रणबीर कपूर स्टारर ‘अॅनिमल’ चित्रपटात बघायला मिळणार आहे.तसेच अभिनेत्रीच्या हातात सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ चित्रपट आहे. टायगर श्रॉफसोबत ‘स्क्रू धीला’ या चित्रपटातही ही अभिनेत्री चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.