Download App

‘बस प्रवास अन् वीज मोफत’; तेलंगणा जिंकण्यासाठी सोनिया गांधींच्या सहा मोठ्या घोषणा…

Sonia Gandhi On Telangana Election : आगामी निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून जोरदार हालचाली सुरु आहेत. भाजपला चारीमुंड्या चीत करण्यासाठी देशभरातील भाजपविरोधी पक्षांची वज्रमूठ बांधून ‘इंडिया'( आघाडीची स्थापना केली आहे. इंडिया आघाडीच्या देशभरात मॅरेथॉन बैठका सुरु असून या बैठकांमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूीवर भाजपविरोधात रणनीती आखण्यात येत आहे. सोनिया गांधी सध्या हैदराबाद दौऱ्यावर आहेत.

महिला उद्योजकांसाठी केंद्र सरकारच्या ‘या’ खास कर्ज योजनांबद्दल तुम्हाला माहित आहे का?

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी हैद्राबादेतून जनतेशी संवाद साधला आहे. येत्या काही दिवसांत देशातील सहा राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. यामध्ये तेलंगणा राज्याचाही समावेश आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सोनिया गांधी यांनी सहा बड्या घोषणा केल्या आहेत.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं…

यावेळी त्यांनी महालक्ष्मी योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला २५०० रुपये भत्ता मिळणार असून गॅस सिलिंडर फक्त ५०० रुपयांना मिळणार आहे. त्याचबरोबर राज्य सरकारकडून चालवण्यात येणाऱ्या परिवहनाच्या बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे.

Devendra Fadanvis : मराठवाड्यात सात वर्षांपूर्वी झालेल्या बैठकीचे फडणवीसांनी दिले ‘फुलप्रुफ’ उत्तर

सोनिया गांधींच्या सहा घोषणा :
महिलांना महालक्ष्मी योजनेंतर्गत महिन्याला अडीच हजार रुपये देणार
महिलांना मोफत बस प्रवास दिला जाणार
शेतकऱ्यांना वर्षाला 15 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार
शेजमजुरांना 12 हजार रुपये देण्यात येतील
शेतकऱ्यांना धान पिकावर 500 रुपयांचा बोनसही मिळणार
सर्व घरांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज

दरम्यान, तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समितीची सत्ता असून के. चंद्रशेखर राव तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत. मागील काही दिवसांपासून तेलंगणा राज्यातील के. चंद्रशेखर राव यांना सोडचिठ्ठी देत बीआरएसच्या अनेक नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर के. चंद्रशेखर राव यांनी आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीचं के चंद्रशेखर राव यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे.

Tags

follow us