Download App

Cash For Query : ‘सरकारकडून माझा फोन हॅक करण्याचा प्रयत्न’; महुआ मोईत्रांच्या आरोपाने खळबळ!

Cash For Query : कॅश फॉर क्वेरी प्रकरण आता अधिकच (Cash For Query) चिघळत चालले आहे. लोकसभेच्या वेबसाइटवरील लॉगइन आयडी आणि पासवर्ड उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांना दिल्याचे मान्य केल्यानंतर खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सरकार आपला फोन आणि ई मेल हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. मला अॅपल कंपनीकडून अलर्ट आणि ई मेल मिळाला की सरकार माझा फोन आणि ई मेल हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे, असा खळबळजनक आरोप मोईत्रा यांनी केला. त्यांच्या या आरोपांनंतर खळबळ उडाली आहे. यानंतर सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

अरविंद केजरीवालही ईडीच्या रडारवर !चौकशीला हजर राहण्यासाठी काढले समन्स

गृह मंत्रालयाला टॅग करत मोईत्रा यांनी लिहिले आहे की अदानी आणि पीएमओचे लोक मला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला वाटणाऱ्या भीतीमुळे मला तुमची दया येते. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी मला आणि इंडिया आघाडीच्या अन्य तीन नेत्यांन असे अलर्ट मिळाले आहेत. त्यांच्या या पोस्टनंतर सरकारकडून अद्याप कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. यावर आता गृहमंत्रालय काय प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

काय आहे प्रकरण ? 

संंसदेत सरकारला प्रश्न विचारण्याच्या मोबद्ल्यात उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप खासदार मोईत्रा यांच्यावर आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर मोईत्रा यांनी लोकसभेच्या वेवसाइटवरील त्यांचा लॉगइन आयडी आणि पासवर्ड हिरानंदानी यांना शेअर केल्याचे मान्य केले होते. तसेच जर रोख स्वरुपात पैसे दिले जात असतील तर त्याची तारीख आणि संबंधित पुरावे देखील सादर करा, असे आव्हान खासदार महुआ मोईत्रा यांनी दिले होते.

मोईत्रा वापरतात हिरानंदांनींची कार 

मोईत्रा म्हणाल्या, दर्शन हिरानंदानी यांच्याकडून काही गोष्ट घेतल्या कारण ते जवळचे मित्र आहेत. वाढदिवसानिमित्त हिरानंदानी यांनी त्यांना मेकअप साहित्य भेट दिल्या होते. हे साहित्य दुबईहून आणण्यात आले होते. घरातील इंटिरिअर बदलण्यासाठी हिरानंदानी यांच्याशी चर्चा केल्याचेही मोईत्रा यांनी सांगितले. परंतु, यावर जो खर्च झाला तो सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या सीपीडब्ल्यूडीने केला होता, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्यावेळी मला बंगल्याचे वितरण केले गेले तेव्हा या घराची स्थिती अतिशय खराब होती. त्यामुळे घराची दुरुस्ती करण्यासाठी हिरानंदानी यांच्याशी चर्चा केली होती, असे मोईत्रा म्हणाल्या. ज्यावेळी मी मुंबईत असते तेव्हा हिरानंदानी यांचीच कार वापरते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Cash For Query : होय, हिरानंदानीला लॉगइन आयडी, पासवर्ड दिला होता; मोईत्रांनी कारणही सांगितलं

पैसे दिले जात असतील तर पुरावे द्या 

एका मुलाखतीत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात मोईत्रा म्हणाल्या होत्या, की मी हिरानंदानी यांना विनंती करते त्यांनी येथे येऊन स्पष्टपणे सांगावे की त्यांनी मला आणखी काय दिले आहे. कुणी कुणावर काहीही आरोप करू शकतो त्याला काहीच मर्यादा नाही. मात्र आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी नेहमीच तक्रारदाराची असते. मला दोन कोटी रुपये दिल्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात कुठेही आढळलेला नाही. जर रोख स्वरुपात पैसे दिले जात असतील तर त्याची तारीख आणि संबंधित पुरावे देखील सादर करा, असे आव्हान खासदार महुआ मोईत्रा यांनी दिले.

Tags

follow us