अरविंद केजरीवालही ईडीच्या रडारवर !चौकशीला हजर राहण्यासाठी काढले समन्स

  • Written By: Published:
अरविंद केजरीवालही ईडीच्या रडारवर !चौकशीला हजर राहण्यासाठी काढले समन्स

ED Summon CM Kejriwal : दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) ही अडचणीत येण्याची शक्यता आहे. आता ईडीने (ED) केजरीवाल यांना नोटीस काढत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. येत्या 2 नोव्हेंबर रोजी केजरीवाल यांना चौकशीसाठी ईडीसमोर चौकशीसाठी उपस्थित राहायचे आहे. मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांची सीबीआयने एप्रिल महिन्याच चौकशी केली होती.

मराठा समाजाला दोन टप्प्यात आरक्षण देणार! मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला सरकारचा प्लॅन

मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे अटकेत आहेत.सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामिन अर्ज फेटाळून लावला आहे. याविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा विचार आम आदमी पक्षाचा आहे.

दिल्ली मद्य घोटाळ्यात सीबीआय आणि ईडी या दोन्ही यंत्रणा चौकशी करत आहे. या प्रकरणात एप्रिल महिन्यात सीबीआयने केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलविले होते. त्यावेळी केजरीवाल यांची तब्बल नऊ तास चौकशी करण्यात आली होती. आता ईडीने केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलविले आहे. केजरीवाल यांना पीएमएलए अधिनियमानुसार समन्स बजाविण्यात आले आहेत. या प्रकरणात केजरीवाल यांचा जबाब ईडी घेणार असल्याचे बोलले जात आहे.

Maratha Reservation चा लढा विखेंच्या बालेकिल्यात तीव्र… शिर्डीमध्ये पुकारला बंद

मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात केजरीवाल यांचाही उल्लेख केलेला आहे. केजरीवाल यांना चौकशीसाठी नोटीस आल्याने आपकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आप सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज यांनी तिखट प्रतिक्रियाही दिली आहे. केंद्र सरकारनेच ईडीला केजरीवाल यांना समन्स पाठविण्यास सांगितले आहे. कोणत्याही पद्धतीने आम आदमी पार्टीला (आप) संपविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळे खोट्या केस करून अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये बंद करून आप संपविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मंत्री भारद्वाज यांनी केला आहे.


सिसोदिया आणि संजय सिंह तुरुंगात

मद्य घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया हे तुरुंगात आहेत. त्यांचा नियमित जामीनही फेटाळण्यात आला आहे. तर मनी लॉड्रिंग प्रकरणात सत्येंद्र जैन आणि मद्य घोटाळ्याप्रकरणी खासदार संजय सिंह यांना ईडीने अटक केलेली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube