Maratha Reservation चा लढा विखेंच्या बालेकिल्यात तीव्र… शिर्डीमध्ये पुकारला बंद
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आता सकल मराठा समाज बांधवांकडून आता आंदोलनाची धार तीव्र करण्यात येऊ लागली आहे.आरक्षणासाठी आता ठिकठिकाणी आंदोलने, निदर्शने तसेच उपोषण सुरु झाले आहे. नगर जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी उपोषण सुरु करण्यात आले आहे. यातच आज शिर्डी येथे बंद पाळण्यात आला आहे.
विखेंच्या बालेकिल्ल्यात मराठा आरक्षणासाठी लढाई तीव्र…
खुद्द राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचा बालेकिल्ला समजले जाणारे शिर्डी हे ठिकाणी राजकीय दृष्ट्या देखील अत्यंत महत्वाचे मानले जाते. यातच आता विखेंच्या बालेकिल्ल्यात मराठा आरक्षणासाठी लढाई तीव्र झाल्याचे हे आजच्या शिर्डी बंदच्याद्वारे दिसून येत आहे. या बंदमध्ये शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत आला आहे. मात्र साईबाबा मंदीरामध्ये भाविकांना जाण्यास मनाई नाही.
आमदार अपात्र प्रकरणात सुप्रीम कोर्ट राहुल नार्वेकरांना दणका देणार?; ॲड. उज्वल निकम यांचा इशारा
मराठा आरक्षण आंदोलनाची ज्योत आता चांगलीच पेटली आहे. महिनाभरात आरक्षण देऊ असे आश्वासन दिल्यानंतर त्याची पूर्तता न झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरु केले आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने मात्र सध्यास्थितीला लोकप्रतिनिधी तसेच पुढारी व नेतेमंडळींनी मात्र चांगलीच कोंडी केली आहे.
अबब! नाशिकमध्ये तब्बल 20 कोटी लिटर पाणी वाया; नदीत ड्रग्ज शोधण्याच्या नादात पोलिसांचा प्रताप
नुकतेच संगमनेरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणाला भेट देण्यासाठी आलेल्या राज्याच्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना काही आंदोलकांच्या घोषणांना सामोरे जावे लागले. “विखे पाटील परत जा, परत जा”, “एक मराठा लाख मराठा” अशा घोषणांनी आंदोलनकर्त्यांकडून विखेंना विरोध करण्यात आला होता. दरम्यान रविवारी झालेल्या या घटनेनंतर आज शिर्डी मध्ये बंदची हाक देण्यात आली आहे.