Download App

Chandigarh Mayor Election : मतपत्रिकेवर खाडाखोड केल्याची निवडणूक अधिकाऱ्याची कबुली ; सरन्यायाधीशांनी ओढले ताशेरे

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Chandigarh Mayor Election Supreme Court Hearing: भाजपकडे (BJP) संख्याबळ नसताना चंदीगड (Chandigarh) महानगरपालिकेर भाजप नेते विनोद तावडे यांनी मोठा चमत्कार घडवत आपला महापौर बसविला. परंतु निवडणूक अधिकाऱ्याची भूमिका संशयास्पद आढळली. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या निवडीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. विशेष म्हणजे निवडणूक अधिकारी यांनी आपली चूक न्यायालयासमोर कबूल केली. त्यानंतर तर मतमोजणीचा संपूर्ण व्हिडिओ, मतपत्रिका सादर करण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेत. पुन्हा निवडणूक होणार की मतपत्रिकेची पुन्हा मोजणी होणार यावर न्यायालय उद्या निर्णय देण्याची शक्यता आहे.


अंकितांनी तीनच वाद सांगितले; पण पवार-पाटील घराण्यात संघर्षाची वात 50 वर्षांपूर्वीच पेटली आहे…

मतपत्रिका सादर करण्याचे आदेश पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारला देण्यात आले आहेत. या मतपत्रिका सुरक्षितपणे न्यायालयात आणणण्यासाठी एक अधिकारी बरोबर पाठवावा, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या सुनावणीसाठी वादात सापडलेले निवडणूक अधिकारी अनिल मसिह हे न्यायालयात हजर होते. न्यायालयाच्या प्रश्नाला उत्तर देताना मसिह यांनी सांगितले की मतमोजणीदरम्यान त्यांनी मतपत्रिकांवर स्वाक्षरी करण्याव्यतिरिक्त, आठ मतपत्रिकांवर खाडाखोड केली होती . मतपत्रिकेत फाटल्याचे आढळून आल्याने त्यांनी असे केल्याचे त्यांनी सांगितले.

अशोक चव्हाण भाजपमध्ये… काँग्रेस अन् अमित देशमुखांच्या डोक्यात काय सुरु आहे?

या निवडणूक अधिकाऱ्यावर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच घोडेबाजारावरून ताशेरे ओढले आहेत. निवडणूक अधिकारी यांना मतपत्रिकेवर सही करण्याचा अधिकार आहे. त्यावर खाडाखोड करण्याचा कुठलाही अधिकार नाही. निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याबद्दल तुमच्यावर खटला चालविला पाहिजे, असा इशाराच चंद्रचूड यांनी दिला आहे. निवडणूक अधिकारी अनिल मसीह यांना उद्याच्या सुनावणीला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

भाजपने ‘आप’ला पाडले खिंडार; महापौरांचा राजीनामा

चंडीगडमधील राजकीय खेळ्या सुरूच आहे. भाजपने आता आपचे तीन नगरसेवक फोडले आहे. त्यामुळे आता भाजपकडे 17 नगरसेवकांचे संख्याबळ झाले आहे. भाजपकडे खासदार किरण खेर यांचे एक मतही आहे. तर अकाली दलाचा एका नगरसेवकाचा पाठिंबा भाजपला आहे. त्यामुळे भाजपकडे 19 नगरसेवक झाले आहेत. त्यामुळे भाजपला पुन्हा येथे आपला महापौर बसविता येणार आहे. महापौर निवडीपूर्वी आप आणि काँग्रेसकडे 20 नगरसेवक होते. परंतु निवडणूक अधिकाऱ्याने आठ मते बाद ठरविले होते. त्यामुळे भाजपच्या विजय सोनकर विजयी झाल्या होत्या. परंतु आता त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ येऊ शकते.

follow us

वेब स्टोरीज