Vinod Tawde : विनोद तावडेंच्या नेतृत्वात भाजपचं मिशन चंदीगड दुसऱ्यांदा यशस्वी

Vinod Tawde : विनोद तावडेंच्या नेतृत्वात भाजपचं मिशन चंदीगड दुसऱ्यांदा यशस्वी

चंदीगड : भाजपचे महासचिव विनोद तावडे यांच्या नेतृत्वात भाजपनं मिशन चंदीगड महापालिकेत दुसऱ्यांदा यशस्वी केलंय. भाजपनं पंजाबची राजधानी चंदीगड महापौर निवडणुकीत अवघ्या एका मतानं बाजी मारली आहे. भाजपनं आम आदमी पार्टीचा अवघ्या एका मतानं पराभव केला. पंजाबमध्ये सत्तेत असणारी आम आदमी पक्षाविरोधात असल्यामुळं भाजपसाठी ही लढाई सोपी नव्हती. विनोद तावडेंच्या रणनिती आणि काँग्रेसच्या सहा नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळं भाजपचा एका मतानं विजय झालाय. आता दिल्लीत काय होणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय.

चंदीगड महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या वाट्याला 15 मतं आली तर ‘आप’ला 14 मतांवर समाधान मानावं लागलं. काँग्रेसच्या सहा नगरसेवकांनी ऐनवेळी सभागृहात दांडी मारली, त्यांची अनुपस्थिती भाजपच्या पथ्यावर पडली आहेत. भाजपच्या अनूप गुप्ता यांनी आम आदमी पक्षाच्या जसबीर सिंह यांचा अवघ्या एका मतानं पराभव केलाय. भाजपचे अनूप गुप्ता चंदीगडच्या महानगरपालिकेचे नवे महापौर झाले आहेत.

सहा नगरसेवक असणाऱ्या काँग्रेसनं आणि एक सदस्य असणाऱ्या शिरोमणी अकाली दलानं महापौरपदाच्या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचं दिसून आलं. त्यामुळं भाजप आणि आप यांच्यातील निवडणूक अटीतटीची होण्याचा पहिलाच अंदाज होता. त्याप्रमाणंच या दोन्ही पक्षात ही चुरशीची लढत पाहायला मिळाली. यात भाजपनं एका मतानं ‘आप’चा पराभव केला.

भाजपच्या विजयात महासचिव विनोद तावडे यांचा सिंहाचा वाटा असल्याचं सांगण्यात येतंय. आता तावडे यांच्यासमोर दिल्ली महानगर पालिकेतलं मोठं आव्हान असणारंय. महापौरच्या निवडणुकीत विनोद तावडे नक्की काय जादू करणार? हे पाहावं लागणारंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube