Mohan Yadav on Bharat Joda Nyaya Yatra : ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Elections) कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) भारत जोडा न्याय यात्रा काढली. आज त्यांची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Joda Nyaya Yatra) अनेक राज्यातून मुंबईत दाखल झाली. दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते मोहन यादव (Mohan Yadav) यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली आहे.
Kalaben Delkar : रश्मी ठाकरे यांनी केलेलं औक्षण कल्पना डेलकर विसरल्या
ऐन लोकसभा निवडणुकीच्चा तोंडावर अनेक नेत्यांनी कॉंग्रेसला राम राम ठोकला. हाच धागा कडून यादव यांनी कॉंग्रेसवर जोरदारी टीका केली. ही भारत जोडो यात्रा नाही, तर कॉंग्रेस छोडो यात्रा सुरू असल्याची बोचरी टीका त्यांनी केली.
लोकसभा निवडणुकीपूर्वी भारत जोडो न्याय यात्रेवर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी धारदार हल्ला आहे. यादव म्हणाले, ते यात्रा करत आहेत आणि पाठीमागे एका पाठोपाठ एक पक्ष आणि एक एक नेते कॉग्रेसला सोडून जात आहेत. राहुल गांधी पुढे जात आहेत आणि कॉंग्रेस मागे जात असल्याची टीका त्यांनी केली. यावेळी बोलतांना यादव यांनी कमलनाथ यांच्या संभाव्य प्रवेशावरही भाष्य केलं. जे दारात उभे आहेत, ते आज ना उद्या प्रवेश करतील, असं सांगत त्यांनी कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता अद्याप कायम असल्याचं सूचित केलं. काँग्रेस पक्षाच्या घराणेशाहीचं समर्थन करतंय, तर भाजप सर्वांना सोबत घेऊन जाते, असं ते म्हणाले.
भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान हे दीर्घकाळ मध्य प्रदेशचे प्रभारी आहेत. आता यावेळच्या विधानसभा निवडणुकीत चौहान विजयी झाले असले तरी त्यांच्या जागी यादव यांना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री करण्यात आले. त्यामुळे चौहान यांच्याशी तुमचे समीकरण कसे आहे, त्यांचा तुमच्यावर काही दबाव आहे का? असं विचारलं असता यादव म्हणाले की, आपण त्यांची खुर्ची घेतली नाही तर ते त्यांनी स्वत: आपल्याला खुर्ची दिली.
ते म्हणाले, काही दिवसांपूर्वीच मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांच्या रॅलीतही मी सहभागी झालो होतो. यानंतरही आम्ही दोघे एका कार्यक्रमात एकत्र आलो. आमचे खूप सौहार्दपूर्ण संबंध असल्याचं यादव म्हणाले.