Download App

कंबख्तको यूपी भेजो, हम इलाज करेंगे, योगी आदित्यनाथ अबू आझमींवर भडकले…

कंबख्त को उत्तर प्रदेश भेज दो, इलाज हम करेंगे, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

  • Written By: Last Updated:

Yogi Adityanath on Abu Azmi : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi यांनी औरंगजेब (Aurangzeb) हा उत्तम प्रशासक होता, असं विधान केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर चांगलंच राजकारण तापलंय. त्यांच्या या वक्तव्याचे महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील पडसाद उमटले. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर उत्तर प्रदेशच्या विधानसभेत आझमींच्या विधानावरून मोठा गदारोळ पाहायला मिळाला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यना (Yogi Adityanath यांनीही अबू आझमींवर हल्लाबोल केला आहे.

बीडमध्ये पडला दगडांचा पाऊस; गावकऱ्यांमध्ये दहशत, नेमकं घडतंय तरी काय? 

कंबख्त को उत्तर प्रदेश भेज दो, इलाज हम करेंगे, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

युपी विधानसभेत बोलतांना योगी आदित्यनाथ चांगलेच आक्रमक झालेत. ते म्हणाले की, अबू आझमींना पक्षातून हाकलून द्या… तसेच कंबख्त अबू आझमींना एकदा उत्तर प्रदेशला पाठवा, आम्ही उपचार करू, असं हल्लाबोल योगी आदित्यनाथ यांनी केला. तसेच अबू आझमी यांना भारतात राहण्याचा अधिकार आहे का? याचं उत्तर समाजवादी पक्षाने द्यावं. समाजवादी पक्षाला भारताच्या वारशाचा अभिमान नाही, किमान ज्यांच्या नावाने ते राजकारण करततात, त्यांचे तरी ऐकले पाहिजे. डॉ. लोहिया म्हणाले होते की, भगवान राम, कृष्ण आणि शंकर हे भारतीय संस्कृतीचा आधार आहेत. आज समाजवादी पक्ष डॉ. लोहिया यांच्या तत्वांपासून, विचारांपासून दूर गेला. आज त्यांनी औरंगजेबाला आपला आदर्श म्हणून स्वीकारले आहे, अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली.

औरंगजेबसारख्या व्यक्तीची समाजवादी पक्षाच्या आमदाराकडून प्रशंसा होते, तरीही समाजवादी पक्षाकडून त्या विधानाचा निषेध का केला जात नाही, असा सवालही योगी आदित्यनाथ यांनी केला.

… तर आम्ही युद्धासाठी तयार, ‘त्या’ प्रकरणात अमेरिकेवर संतापला चीन, दिलं आव्हान 

अबू आझमींचे निलंबन –
अबू आझमी यांना औरंगजेबाचे उदात्तीकरणं भोवलं आहे. अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे.

अबू आझमी नेमकं काय म्हणाले होते?
अबू आझमी म्हणाले होते की, औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या काळात भारताच्या सीमा अफगाणिस्तानपर्यंत पसरल्या होत्या. एवढेच नाही तर त्याच्या काळात भारताचा जीडीपी २४ टक्के होता. त्याच्या काळात भारताला ‘सोने की चिडियां’ म्हटल्या जायं. संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई सत्तेसाठी होती, त्यांच्यातील लढाई धर्मासाठी नव्हती, असं आझमी यांनी म्हटलं होतं.

follow us