Congress attacks MNREGA name change BJP MP Ajay Bhatt invokes Ram Nama mantra on issues ranging from marriage to disputes : संसदेच्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामध्ये मनरेगा या योजनेमध्ये सरकारने केलेल्या बदलांवरून राजकीय घामासान सुरू झालं आहे. त्यामध्ये सरकारकडून मनरेगा योजनेचं नावात बदल करण्यात आला आहे. त्यावर विरोधी पक्ष आणि विशेषत: काँग्रेसने महात्मा गांधींचे नाव हटवल्याने आक्षेप घेतला आहे.
यावर प्रियांका गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. यावर लोकसभा खासदार भाजपा खासदार अजय भट्ट यांनी सरकारची बाजू मांडली. ज्यामध्ये त्यांनी योजनेचे नाव बदलून ठेवलं आहे त्यातून राम नामाचा महिमा सांगितला जात आहे. बाहेर काढण्याचा हा मार्ग आहे असेही त्यांनी म्हटले.
KGF च्या सह-दिग्दर्शकाच्या 4 वर्षांच्या मुलाचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू
त्याचबरोबर ते म्हणाले की, योजनेच्या बदललेल्या नावावर आक्षेप घेण्याचा प्रश्नच नाही. खरं तर काँग्रेस हा मुद्दा विनाकारण समोर आणत आहे. राम, हे राम श्रीराम जय राम जय जय राम हे नऊ शब्द एक सिद्ध मंत्र आहे. जे स्वतः महात्मा गांधी यांनी देखील आत्मसात केला होता. ज्यामध्ये चुकीचं किंवा आक्षेपार्ह काही नाही.
बिबट्याची दहशत…; विखेंचा तो किस्सा…; आमदार सत्यजित तांबे यांनी मांडले वास्तव
गांधीजींचा सन्मान पूर्वी सारखाच केला जात आहे. मात्र योजनेच्या नावात राम नाम आलं आहे. त्याचा कॉंग्रेसला राग येतो. या योजनेच्या नावाचा पूर्ण अर्थ अजय भट्ट यांनी सांगितलं. विकसित भारत जी राम जी, म्हणजे भारत गॅरंटी फॉर रोजगार एंड मिशन ग्रामीण असा त्याचा पूर्ण अर्थ आहे. तसेच आता सोशल मिडीयावर देखील हा एक सिद्ध मंत्र असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ज्याचा फायदा मुलींचे विवाह जमत नसतील, नोकरी लागत नसेल , घरात वाद होत असलतील , पती-पत्नीचे वाद होत असतील, त्यासाठी राम नाम पाठवा तुमच्या समस्या संपतील. असं देखील भट्ट म्हणाले.
मोठी बातमी, अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी; प्रशासन अलर्ट मोडवर
मात्र एका खासदाराने थेट संसदेत अशा प्रकारे राम नामाचा प्रचार केल्याने सध्या हा चर्चेचा विषय झाला आहे. भट्ट यांच्या संसदेतील या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यावर काही लोक त्यांचं समर्थन तर काही लोक त्यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. ते म्हणत आहेत की, नाव बदलून काहीही होणार नाही. रोजगार मिळायला हवा.
• If you are not getting a job
• If the cow is not giving milk
• If the boy has turned spoiled
• If the girl is not getting married
• If things aren’t working out between husband and wifeJust say ‘Shri Ram, Jay Ram, Jay Jay Ram, and everything will be solved.
All BJP… pic.twitter.com/4FLuuiIcfg
— Mohit Chauhan (@mohitlaws) December 18, 2025
