काँग्रेसचे नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांना केंद्रीय मंत्री अमित शाहा(Amit Shah) यांच्याबद्दल बोलणं चांगलचं अंगलट आलं आहे. अमित शाहांबद्दल वक्तव्य केल्याप्रकरणी गांधींना न्यायालयाने 16 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Jhimaa 2 मध्ये ‘या’ पात्राला झालेला पार्किनसन्स आजार नेमका काय? जाणून घ्या…
राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपचे नेते विजय मिश्रा यांनी 5 वर्षांपूर्वी विशेष न्यायालयात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर आता निर्णय घेण्यात आला आहे. मिश्रा तक्रारीत म्हणाले, 15 जुलै 2018 रोजी अनिरुद्ध शुक्ला आणि दिनेश कुमार यांनी त्यांच्या मोबाईलवरील व्हिडिओ क्लिप दाखवली होती. यामध्ये राहुल गांधी अमित शहांना खुनी म्हणत होते. हे वक्तव्य म्हणजे राजकीय स्टंट असून त्यामुळे अपमान होत असल्याचे फिर्यादीने न्यायदंडाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
पुणे : वडगाव शेरी परिसरात इथेलिन ऑक्साईड वायू टँकरचा अपघात; नगर रोडवरील वाहतूक विस्कळीत
राहुल गांधी यांचं हे विधान बंगळुरूमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमधील असून हे विधान न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूशी संबंधित तथ्यांबाबत देण्यात आले होते. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शहा यांना क्लीन चिट दिली आहे. मिश्रा यांचे वकील संतोष पांडे यांनी सांगितले की, तक्रारदार आणि दोन साक्षीदारांचे म्हणणे आणि पुराव्यांच्या आधारे न्यायदंडाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना कलम ५०० अंतर्गत सुनावणीसाठी समन्स बजावले आहे. त्यांना समन्स बजावण्यात आले असून 16 डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
“तुझी बायकापोरं ज्याने संकटात टाकली त्याला भेटायला का गेला?” : भुजबळांचा क्षीरसागरांना सवाल
दरम्यान, याआधीही राहुल गांधी आपल्या विधानांमुळे अनेकदा अडचणीत आले आहेत. कर्नाटकमध्ये आयोजित सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावाबद्दल उल्लेख करुन वादग्रस्त विधान केल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांनी दोन वर्षांची शिक्षाही न्यायालयाकडून सुनावण्यात आली होती. एवढंच नाहीतर राहुल गांधी यांची खासदारीकीही धोक्यात आली होती. लोकसभेच्या अध्यक्षांनी राहुल गांधी यांच्यावर कारवाई केली होती. राहुल गांधी यांची खासदार रद्द करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडू राहुल गांधी यांना दिलासा मिळाला होता.
आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांचं 2018 सालचं अमित शाहा यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. आता न्यायालयात त्यांना हजर रहावे लागणार आहे. या प्रकरणातही त्यांच्यावर न्यायालय कारवाई करणार का? असा सवाल सध्या देशभरात उपस्थित होत आहेत.