Rajat Sharma : लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या (Lok Sabha Election Result) दिवशी लाईव्ह टेलिकास्ट दरम्यान पत्रकार रजत शर्मा (Rajat Sharma) यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप काँग्रेस नेत्या रागिणी नायक (Ragini Nayak) यांनी केला होता त्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करण्यात आले होते. त्यामुळे पत्रकार रजत शर्मा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) काँग्रेस नेत्यांनविरुद्ध मानहानीचा दावा केला होता.
तर आता समोर आलेल्या माहितीनुसारमी, रजत शर्मा यांना मानहानी प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा देत काँग्रेस नेते रागिणी नायक, पवन खेडा आणि जयराम रमेश यांना एक्ससह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून व्हिडिओ काढून टाकण्याचे निर्देश दिले आहे.
या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा (Justice Nina Bansal Krishna) म्हणाले की, काँग्रेसच्या तिन्ही नेत्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रजत शर्मा यांच्या विरोधात एक व्हिडिओ व्हायरल करत तो व्हिडिओ इंडिया टीव्हीवरील लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीची ‘रॉ फुटेज’ असल्याचा दावा केला आहे. मात्र या प्रकरणात निकाल लागेपर्यंत तो कन्टेन्ट सोशल मीडियावर राहिला तर फिर्यादीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचेल आणि ती हानी व्यावहारिकदृष्ट्या कधीही भरून न येणारी असेल.
पुढे न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा म्हणाले, देशात नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे मात्र परंतु घटनेचे सत्य उघड करणेही त्यांचे कर्तव्य आहे. फिर्यादीला दोषी ठरवणारी एक्स-पोस्ट तथ्यांचे स्पष्टपणे खोटे चित्रण करण्याशिवाय दुसरे काहीही नाही यामुळे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून तो व्हिडिओ सात दिवसांच्या आत काढून टाकावेत. याच बरोबर जे व्हिडिओ सार्वजनिक डोमेनमध्ये आहेत, ते गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने खाजगी करावेत आणि न्यायालयाच्या आदेशाशिवाय ते सार्वजनिक डोमेनमध्ये टाकू नयेत, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
प्रकरण काय
लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी लाईव्ह टेलिकास्ट दरम्यान पत्रकार रजत शर्मा यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप काँग्रेस नेत्या रागिणी नायक यांनी केला होता. या प्रकरणी काँग्रेस नेते पवन खेडा आणि जयराम रमेश यांनीही रागिणीचे समर्थन केले होते आणि व्हिडिओ क्लिप शेअर केली होती ज्यामध्ये रजत शर्मा गैरवर्तन करताना दिसत आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या विजयाने इंग्लंडची चांदी, सुपर 8 मधील एन्ट्री पक्की; स्कॉटलंडचं स्वप्न भंगलं
तसेच या प्रकरणात काँग्रेस नेत्या रागिणी नायकने दिल्लीच्या तुघलक लेन पोलिस ठाण्यात इंडिया रजत शर्माविरुद्ध कलम 294 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तसेच रजत शर्मा यांनी बिनशर्त माफी मागावी अशी मागणी देखील त्यांनी केली होती. तर दुसरीकडे रजत शर्मा यांनी काँग्रेस नेत्या रागिणी नायकचे आरोप फेटाळून लावत शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायलयात मानहानीचा खटला दाखल केला होता.