Delhi Assembly Election Results 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने (Delhi Assembly Election Results 2025) आम आदमी पार्टीला सत्तेतून बेदखल केले. या निवडणुकीत भाजपने 48 जागा जिंकत बहुमत पार केले. भाजपाच्या लाटेत आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, सोमनाथ भारती यांसारखे दिग्गज पराभूत झाले. यानंतर आता दिल्लीचा मुख्यमंत्री (Delhi Elections) कोण होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Ami Shah) यांच्या निवासस्थानी चर्चा झाली होती. या बैठकीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, बैजयंत पांडा, बीएल संतोष उपस्थित होते. आता मुख्यमंत्रिपदाचा शपथविधीबाबत मोठी अपडेट मिळाली आहे.
अमित शाहंची बैठक, आतिशींचा राजीनामा…दिल्लीत सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) परदेश दौऱ्यावरून माघारी परतल्यानंतर दिल्लीत शपथविधी सोहळा आयोजित केला जाऊ शकतो. पीएम मोदी 14 फेब्रुवारीला भारतात परततील. त्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी होईल. हा समारंभ भव्य करण्याचे भाजपाचे नियोजन आहे. तसेच या कार्यक्रमात एनडीचे अनेक नेते सहभागी होणार आहेत.
याआधी निवडणुकीचे निकाल आल्यानंतर शनिवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा, अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. याही बैठकीत दिल्लीतील संभाव्य सरकार आणि मुख्यमंत्री कोण असेल यावर चर्चा झाली. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार (Election Commission of India) दिल्लीत भाजपला 45.56 टक्के आणि आम आदमी पक्षाला 43.57 टक्के मते मिळाली. भाजपने 48 जागा जिंकून भाजपने विजयी आघाडी घेतली. आम आदमी पक्षाला मात्र 22 जागा मिळाल्या.
दिल्ली विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. यात भाजपला (BJP) बहुमत मिळालंय तर कॉंग्रेस आणि आपला अपेक्षित यश मिळालं नाहीये. आम आदमी पक्षाच्या दारुण पराभवानंतर मुख्यमंत्री आतिशी यांनी रविवारी राजीनामा सादर केलाय. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी आज सकाळी 11 वाजता राज निवास गाठले. दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांना राजीनामा सादर केला. आतिशी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर, उपराज्यपालांनी सातवी दिल्ली विधानसभा बरखास्त केली.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आतिशी मुख्यमंत्री झाल्या होत्या. 21 सप्टेंबर रोजी त्यांचा शपथविधी झाला. त्या सुमारे चार महिने दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिल्यात. या दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’चा दारुण पराभव झालाय.
कोकणात ठाकरेंना मोठा धक्का! राजन साळवींसह ‘ते’ दोन आमदार शिंदे गटाच्या वाटेवर