Download App

देशातील सर्वात श्रीमंत राज्य कोणते? महाराष्ट्राचा नंबर कितवा, वाचा सविस्तर..

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने भारतातील सर्वात गरीब आणि श्रीमंत राज्यांचा खुलासा करत एक अहवाल जारी केला आहे.

PMEAC Report India GDP : १९६०-६१ चा काळ आठवा. या काळात देशाच्या जीडीपीत एकट्या (Gross Domestic Product) पश्चिम बंगालचा वाटा साडेदहा टक्के इतका होता. परंतु कालांतराने यामध्ये घसरण होत गेली आजमितीस बंगाल खूप (West Bengal) मागे पडला आहे. देशाच्या एकूण जीडीपीत (India GDP) फक्त ५.६ टक्के इतकेच योगदान राहिले आहे. राज्यातील प्रति व्यक्ती उत्पन्नात देखील घट झाली आहे.

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने भारतातील सर्वात गरीब आणि श्रीमंत राज्यांचा खुलासा करत एक अहवाल जारी केला आहे. देशातील कोणत्या राज्याचे देशाच्या जीडीपीमध्ये किती योगदान आहे याची सविस्तर माहिती या अहवालात देण्यात आली आहे. या आकडेवारी वरून संबंधित राज्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे याचाही अंदाज बांधता येतो.

पश्चिम बंगालने वाढवले टेन्शन

ईएसी-पीएम रिपोर्ट (PMEAC Report) मंगळवारी जारी करण्यात आला. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या नेतृत्वातील पश्चिम बंगाल राज्याचा देशाच्या जीडीपीमधील वाटा वेगाने घटला आहे. मागील काही दशकांपासून ही घसरण सुरू आहे. राज्याचा जीडीपी तर कमी झाला आहेच शिवाय राज्यातील प्रति व्यक्ती उत्पन्न (Per Capita Income) सुद्धा कमी झाले आहे. आता हे प्रमाण ८३.७ टक्के राहिले आहे कधीकाळी हे प्रमाण १२७.५ टक्के इतके होते. पश्चिम बंगालमधील प्रति व्यक्ती उत्पन्न आता राजस्थान आणि ओडिशा यांसारख्या परंपरागत मागासलेल्या राज्यांपेक्षाही कमी झाले आहे. बंगाल वगळता अन्य समुद्र किनारी राज्यांनी देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत चांगली प्रगती केली आहे.

राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, शिंदे सरकारचा मोठा निर्णय, लागू होणार सुधारित पेन्शन योजना

बिहार सुधारला पण महाराष्ट्राला फटका

या अहवालात बिहारचे (Bihar) आकडे समाधानकारक राहिले आहेत. मागील दोन दशकांच्या काळात राज्याची परिस्थिती स्थिर राहिली आहे. असे असले तरी अन्य राज्यांच्या तुलनेत बिहार अजूनही खूप मागे आहे आणि बिहारला या राज्यांच्या बरोबरीने यायचे असेल तर अतिशय वेगाने विकास करावा लागणार आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने देशांतील तिसऱ्या मोठ्या राज्याचे देशाच्या जीडीपीतील योगदान फक्त ४.३ टक्के इतकेच आहे. या व्यतिरिक्त देशाच्या जीडीपीतील उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) योगदान १९६०-६१ मध्ये १४ टक्के कमी होऊन आता ९.५ टक्के राहिले आहे.

या अहवालात महाराष्ट्राचा विशेष (Maharashtra) उल्लेख करण्यात आला आहे. देशाच्या जीडीपीत सर्वाधिक योगदान देणारे राज्य म्हणून महाराष्ट्राने आपला नावलौकिक कायम राखला आहे. पण मागील काही वर्षात राज्याचे योगदान काहीसे कमी झाले आहे. १५ टक्क्यांवरून १३.३ टक्के इतके कमी झाले आहे. मात्र राज्यातील प्रति व्यक्ती दरडोई उत्पन्न २०२४ पर्यंत राष्ट्रीय सरासरीच्या १५०.७ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

दिल्ली हरियाणासह साऊथचा दबदबा

देशाच्या जीडीपीत योगदान देणाऱ्या राज्यांच्या यादीत आता दक्षिणेकडील राज्यांचा दबदबा दिसून येत आहे. या रिपोर्टनुसार कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू संयुक्तपणे भारताच्या जीडीपीत ३० टक्के हिस्सेदार आहेत. उत्तर भारतातील दिल्ली आणि हरियाणा या राज्यांनीही चांगली प्रगती केली आहे. प्रति व्यक्ती दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत दिल्ली देशात टॉप आहे. दिल्लीत प्रति व्यक्ती उत्पन्न २०२३-२४ मध्ये राष्ट्रीय सरासरीच्या २५०.८ टक्के, तेलंगणा १९३ टक्के, कर्नाटक १८०.७ टक्के, हरियाणा १७६.८ टक्के आणि तामिळनडूमधील प्रति व्यक्ती दरडोई उत्पन्न १७१.१ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

Delhi Liquor Scam : षडयंत्राचा सूत्रधार अरविंद केजरीवाल; ईडीच्या चार्जशीटमध्ये कोण-कोणते आरोप?

follow us