Download App

Ed Raid : ‘ईडी’चे धाडसत्र! पश्चिम बंगाल सरकारच्या दोन मंत्र्यांच्या घरांवर छापेमारी

ED Raid on West Bengal Minister : ईडीच्या छापेमारीवरून सध्या पश्चिम बंगालचे राजकारण चांगलेच (ED Raid) तापले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ भाजपाने रॅली काढली होती. या रॅलीदरम्यान भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांत झटापट झाली होती. यानंतर ईडी पुन्हा अॅक्शनमध्ये आली आहे. ईडीचे पथक आज सकाळीच नगर निगम भरती घोटाळ्याच्या चौकशीच्या प्रकरणात ममता बॅनर्जी सरकारधील दोन मंत्र्यांच्या (West Bengal) घरी छापेमारीसाठी पोहोचले आहे. अग्निशमन सेवा मंत्री सुजित बोस यांच्या दोन ठिकाणांची तपासणी तसेच आणखी एक मंत्री तापस रॉय यांच्याही काही ठिकाणांची तपासणी करण्यासाठी पथक दाखल झाले आहे. याव्यतिरिक्त नगरपालिकेचे माजी उपाध्यक्षांच्या घरावरही ईडीने धाड टाकली आहे.

Mahadev Betting App : मोठी बातमी! ‘महादेव अ‍ॅप’च्या मालकाला दुबईत अटक; भारतात आणणार

ईडीने याआधी ऑक्टोबर महिन्यात मंत्री ज्योतिप्रिय मल्लिक यांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यानंतर रेशन घोटाळ्यात त्यांना अटक केली होती. पंधरा तासांच्या तपासणीनंतर मल्लिक यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांव हल्ल्याची घटना घडली होती. रेशन घोटाळा प्रकरणात राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या ब्लॉक पातळीवरील नेत्यांच्य घरी छापेमारीसाठी जात असताना पथकावर हल्ला झाला होता. संदेशकली गावाजवळ हल्ला झाला होता.

येथील गावकऱ्यांनी हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. येथील टीएमसी नेते शाहजहां शेख यांच्या घरी तपासणी करण्यासाठी पथक निघाले होते. याचवेळी गावकऱ्यांनी पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफच्या वाहनांचेही नुकसान झाले होते. तीन अधिकारी गंभीर जखमी झाले. त्यावेळी ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक घेत न घाबरता तपासणी सुरुच ठेवण्याचे आदेश दिले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीचे कार्यवाहक निदेशकांनी अधिकाऱ्यांना एनआयएबरोबर काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. जेणेकरून शाहजहां शेख यांच्या बांग्लादेशबरोबरील संबंधांचीही तपासणी करता येईल.

West Bengal : बंगालमध्ये हल्लेखोरांच्या गोळीबारात TMC नेत्याचा मृत्यू

follow us